मुंबई

गर्दीच्या लोकलचा प्रश्न पेटणार

CD

बदलापूर, ता. १७ (बातमीदार) : कर्जत आणि कसारा रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांमधील वाढत्या गर्दीचा प्रश्न गंभीर बनला असून, गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढविण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. मात्र, लोकल वाढविण्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय १ डिसेंबरचे जनआंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.

सकाळी कामावर जाणाऱ्या आणि संध्याकाळी परतणाऱ्या प्रवाशांना गर्दीमुळे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेने ६ ऑक्टोबरला मुंबईच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) सविस्तर निवेदन दिले होते. गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी करत, त्यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास १ डिसेंबरला जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मात्र, महिना उलटूनही रेल्वे प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने घनघाव यांनी पुन्हा डीआरएम यांना संदेश पाठवून रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निवेदनाची प्रत लोहमार्ग पोलिस आयुक्त राकेश कलासागर आणि रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त राहुल राज यांनाही पाठविण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घनघाव यांच्याशी संपर्क साधला. प्रवाशांच्या सुरक्षिततेला गर्दीमुळे निर्माण होणारा धोका आणि संभाव्य आंदोलन टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही!
रेल्वे प्रशासनाने चर्चेसाठी बोलावल्यास संघटना तयार आहे. मात्र, केवळ तोंडी आश्वासन देऊन प्रश्न सुटणार नाही. लोकल वाढविण्याबाबत लेखी आश्वासन देऊन ठरलेल्या मुदतीत कार्यवाही करावी; अन्यथा १ डिसेंबरला जनआंदोलन केले जाईल, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे कर्जत आणि कसारा मार्गावरील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेसला हव्यात १०० हून अधिक जागा, नाराज अखिलेश किती जागा देणार?

Trump Modi Quad meeting: कणखर व्यक्तिमत्व! क्वाड नेत्यांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

SCROLL FOR NEXT