मुंबई

‘नेहरू सेंटर’तर्फे २१ नोव्हेंबरला विशेष संगीताची मेजवानी

CD

मुंबई, ता. १८ : लहान मुलांच्या निरागस आवाजातून उमटणारी गाणी नेहमीच मनाला आनंद देतात. त्यात मराठी आणि हिंदीतील लोकप्रिय गीतांची जोड मिळाली, तर ही मैफल आणखी रंगतदार होते. अशाच सुरेल अनुभवाची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. बालदिनानिमित्त वरळी येथील नेहरू सेंटरतर्फे २१ नोव्हेंबरला ‘प्रसन्नतेचा गाव’ हा विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात १५ बालकलाकार विविध गीतप्रकार सादर करणार आहेत.‌ या कार्यक्रमाची संकल्पना, संगीत लेखन आणि दिग्दर्शन डॉ. वर्षा भावे यांचे आहे. गेल्या पाच दशकांपासून त्या बालगायकांना संगीताचे प्रशिक्षण देत असून, अनेक कलाकारांना त्यांनी संगीत क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. भावगीत, भजन, नाट्यगीत आणि लोकगीत अशा विविध प्रकारांतील गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. बालकलाकारांसोबत अनुभवी वादकांची संगीतसाथही या मैफलीला लाभणार आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजन आणि संवादिनी वादन सोमेश नार्वेकर करणार आहेत. सिंथेसायझरवर अमित गोठीवरेकर आणि कौशिकी जोगळेकर, ऑक्टोपॅडवर सिद्धार्थ कदम, ढोलकी व ढोलकवर हनुमंत रावडे, तर तबल्यावर निशाद करलगीकर साथ देणार आहेत.

मुंबई : ‘प्रसन्नतेचा गाव’ संगीत कार्यक्रमात बालकलाकार सहभागी हाेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठ महामार्गावरून शिंदे सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर

Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या पुस्तकाने रचले विक्रीचे नवे विक्रम! तब्बल 'एवढ्या' कोटींचा झाला व्यवसाय

SCROLL FOR NEXT