मुंबई

बालहक्कांसाठी वस्त्यांमध्ये अभियान!

CD

बालहक्कांसाठी वस्त्यांमध्ये अभियान!
छायाचित्र प्रदर्शन, बालसभा, नागरिकांशी संवादातून जागर
धारावी, ता. १८ (बातमीदार) : मुलांची सुरक्षा ही प्रत्येक प्रौढ व्यक्तीची तसेच संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. याच विचारातून युवा संस्था आणि बाल अधिकार संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत बाल अधिकार सप्ताहानिमित्त ‘आमची वस्ती, आमची सुरक्षा’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती अभियानाचे आयोजन कांदिवली, मालवणी, मानखुर्द, वांद्रे, चेंबूर आणि बोरिवली परिसरात करण्यात येत आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश मुलांसाठी हिंसामुक्त, सुरक्षित आणि बालस्नेही वस्ती निर्माण करणे तसेच मुलांच्या सुरक्षेमध्ये समुदायाची भूमिका आणि सामूहिक जबाबदारी अधिक मजबूत करणे हा आहे. मुलांच्या सुरक्षेबाबत समुदायामध्ये जनजागृती निर्माण करणे आणि मुलांच्या संरक्षणासाठी समुदायाची भूमिका समजून घेणे, मुलांच्या नजरेतून आपली वस्ती, सुरक्षेशी संबंधित प्रश्न आणि अनुभव छायाचित्रांच्या माध्यमातून जाणून घेणे तसेच हे मुद्दे समुदायासमोर मांडणे, सार्वजनिक ठिकाणी समुदायातील नागरिकांसोबत मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करणे, बालसभेच्या माध्यमातून मुलांना आपले विचार मांडण्याची, समस्या व्यक्त करण्याची आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे असे चार प्रमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.

बाल संरक्षण समिती स्थापन करा!
अभियानाच्या माध्यमातून मुले, युवक, पालक, स्थानिक समुदाय, शिक्षक, पोलिस प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. युवा संस्थेचे समन्वयक आणि बाल अधिकार कार्यकर्ते प्रकाश भवरे यांनी सांगितले की, मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलांच्या संरक्षणाशी संबंधित यंत्रणा, शाळा आणि स्थानिक प्रशासन यांनी एकमेकांशी समन्वय साधून एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. मुलांसाठी हिंसामुक्त आणि सुरक्षित प्रभाग निर्माण करण्यासाठी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली बाल संरक्षण समिती स्थापन करून ती सक्रिय करण्यासाठी समुदायाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.”

बालस्नेही वस्त्यांची निर्मिती
‘आमची वस्ती, आमची सुरक्षा’ या बाल अधिकार सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळावे, त्याचे म्हणणे ऐकले जावे आणि त्याला स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळावी, यासाठी सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती आणि सामुदायिक सहभागातून सुरक्षित व बालस्नेही वस्त्यांची निर्मिती करणे, हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ball Tampering 2018: कमिन्ससह स्टार्कही अडकणार? ज्या बॅनक्रॉफ्टने सँडपेपरचा वापर केला, त्यानेच अखेर केला मोठा गौप्यस्फोट

४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : आयफोनच्या ईएमआयवरून वाद; मित्राची चाकूने वार करून हत्या

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

रुपाली चव्हाण यांची राष्ट्रीय योगा रेफ्री पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT