मुंबई

शिरोशी ग्रामविकास अधिकाऱ्याचे निलंबन

CD

मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील शिरोशी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण घायवट यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा मुकणे यांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १७) दिले आहेत. या कारवाईमुळे ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात उपोषणाला बसलेले उपसरपंच शेखर देशमुख यांनी आंदोलन मागे घेतले.
लक्ष्मण घायवट हे शिरोशी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी असताना विविध प्रकारचे गैरव्यवहार केल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. तसेच सरपंच मुकणे यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने १४ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा दावा देशमुख यांनी तक्रारीत केला होता. याप्रकरणी वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने देशमुख यांनी मंगळवारी (ता. १७) ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. अखेर त्यांच्या उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनासह सरपंचांच्या कारभाराची चौकशी करण्याची कार्यवाही सुरू केली. यासंदर्भातील कारवाईचे पत्र मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास देशमुख यांना देण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. जिल्हा परिषद प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन कारवाई सुरू केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या पुस्तकाने रचले विक्रीचे नवे विक्रम! तब्बल 'एवढ्या' कोटींचा झाला व्यवसाय

Pune Water Scarcity : तर पुणेकरांवर तीव्र पाणीकपातीचे संकट येईल - प्रशांत जगताप

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठ महामार्गावरून शिंदे सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर

'शुटिंगवेळी दुखापत झाली अन् ' महेश लिमयेंनी सांगितला अशोकमामांचा सेटवरचा प्रसंग, म्हणाले... '5 दिवस त्यांना...'

SCROLL FOR NEXT