मुंबई

‘हिट अँड रन’चे तीन पीडित भरपाईपासून वंचित

CD

मुंबई, ता. १८ : हिट अँड रन अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. पात्र पीडितांपैकी चारपैकी तीन जणांना भरपाई मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘प्रायमस पार्टनर्स’च्या नव्या अहवालातून समोर आले आहे.

देशात दरवर्षी सुमारे ७० हजार हिट अँड रन अपघात होतात. यामध्ये ३० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, तर १६ हजारांहून अधिक जण गंभीर जखमी होतात. ‘हिट अँड रन प्रकरणांतील बळींना मिळणाऱ्या भरपाईचा पुनर्विचार : ऑटोमेशनद्वारे ६०० कोटींची मदत कशी सुलभ होऊ शकते’ या अहवालात सध्याच्या भरपाई व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

२०२२च्या भरपाई योजनेंतर्गत हिट अँड रन अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, तर गंभीर दुखापत झाल्यास ५० हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे. या योजनेनुसार दरवर्षी ६०० कोटींहून अधिक मदत वितरित होणे अपेक्षित असताना, चार वर्षांच्या कालावधीत ३०० कोटी रुपयांपेक्षाही कमी रक्कम पीडितांपर्यंत पोहोचली आहे.

नोडल एजन्सी बनवण्याची शिफारस
भरपाई प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हा पोलिसांना नोडल एजन्सी बनवण्याची शिफारस करण्यात आली आहे. अपघाताचे हिट अँड रन म्हणून वर्गीकरण होताच भरपाईची प्रक्रिया आपोआप सुरू व्हावी. तसेच दावे इलेक्ट्रॉनिक डिटेल्ड ॲक्सिडेंट रिपोर्ट (ई-डीएआर) प्रणालीशी जोडून प्रत्येक दाव्याला स्वतंत्र ट्रॅकिंग क्रमांक द्यावा, असे अहवालात म्हटले आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून कुटुंबांना दावे दाखल करण्यासाठी मदत करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lift Rules 2026 : १२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट वापरता येणार नाही; राज्यात नवे कडक नियम लागू, उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द!

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Latest Marathi News Live Update : मोर्शी नगरपरिषदेतील 'ओल्या पार्टी' प्रकरणी मोठी कारवाई

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

SCROLL FOR NEXT