मुंबई

माणुसकीच्या नात्यांचा सुंदर आविष्कार

CD

धारावी, ता. १८ (बातमीदार) : गुरू नानक (स्वायत्त) महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शांतिवन कुष्ठरोग निवारण समिती येथे दिवाळीनिमित्त नुकताच ज्येष्ठ नागरिकांसोबत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला हाेता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांसोबत आनंदाचे क्षण घालवत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा प्रत्यय दिला.

समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, त्यांच्याशी संवाद साधणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सहानुभूती आणि मानवतेची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यानिमित्त विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमाची आकर्षक सजावट करून उत्सवी वातावरण निर्माण केले. आजी-आजोबांना फराळ, मिठाई आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या भेटींमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिन्दर कौर भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. सुमीत खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले हाेते.

शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर समाजाप्रती जबाबदारी आणि माणुसकीची जाणीव निर्माण करणे होय, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आनंद वाटल्याने वाढतो आणि माणुसकीतूनच समाजाची खरी समृद्धी घडते, ही भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली.

मनोरंजक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मनोरंजक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आजी-आजोबांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विविध स्पर्धांतील विजेत्यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे ज्येष्ठांना विरंगुळ्यासोबतच आनंदाचे क्षण अनुभवता आले.

धारावी : गुरू नानक काॅलेजच्या वतीने आजी-आजोबांसोबत स्नेहमेळावा साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

Devuthani Ekadashi Do's & Don'ts: देवउठणी एकादशीला चुकूनही करू नका 'या' ६ चुका; व्रत करणाऱ्यांनी लक्षात ठेवा महत्त्वाचे नियम!

Ball Tampering 2018: कमिन्ससह स्टार्कही अडकणार? ज्या बॅनक्रॉफ्टने सँडपेपरचा वापर केला, त्यानेच अखेर केला मोठा गौप्यस्फोट

४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : आयफोनच्या ईएमआयवरून वाद; मित्राची चाकूने वार करून हत्या

SCROLL FOR NEXT