मुंबई

वमहामार्गावरील उड्डाणपुलांच्या कठड्यांची उंची वाढविण्याचे काम सुरू

CD

महामार्गावर सुरक्षेचा पेच!
काँक्रीटीकरणामुळे उड्डाणपुलांचे कठडे ठेंगणे; वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
कासा, ता. १८ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी घोडबंदर ते अच्छाडदरम्यान जुन्या डांबरी रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे, मात्र रस्त्याची उंची वाढल्याने उड्डाणपुलांवरील संरक्षक कठडे तुलनेने ठेंगणे झाले असून, वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन आता काही उड्डाणपुलांवरील कठड्यांची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दुसरीकडे, महामार्गावरील अनेक सेवा रस्ते अद्याप अपूर्ण असल्याने प्रवाशांची गैरसोय कायम आहे.

महामार्गावरील जुन्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी घोडबंदर ते अच्छाडदरम्यान रस्त्याचे जवळपास एक फूट उंचीचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. या कामात अनेक उड्डाणपुलांचाही समावेश होता, मात्र रस्त्याची पातळी उंचावली असताना पुलांच्या बाजूचे संरक्षक कठडे जुन्याच उंचीवर राहिल्याने त्यांची संरक्षक क्षमता कमी झाल्याची चिंता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी कठड्यांची दुरवस्थाही झाली आहे. त्यामुळे आता कठड्यांची उंची वाढवून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत.

वाहनचालकांची कसरत
मुख्य महामार्गाचे काम सुरू असले तरी अनेक ठिकाणचे सेवा रस्ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. काही ठिकाणी अचानक सेवा रस्ता संपत असल्याने वाहनचालकांना मार्ग बदलताना कसरत करावी लागते. वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास ती सुरक्षितपणे बाजूला उभी करण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध होत नाही. याचा फटका स्थानिक नागरिकांनाही बसत असून, दैनंदिन ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत.

रात्रीच्या प्रवासात अपघाताचा धोका
महामार्गावरील काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे विभाजक तुटलेले असून, लोखंडी सळ्याही अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेल्या आहेत. रात्रीच्या वेळी या अडथळ्यांवरील रेडियम पट्टे स्पष्टपणे दिसत नसल्याने वाहनचालकांसाठी प्रवास धोकादायक ठरत असल्याची तक्रार होत आहे. त्यामुळे कठड्यांची उंची वाढवण्याबरोबरच तुटलेले विभाजक, लोखंडी सळ्या आणि अपूर्ण सेवा रस्त्यांची कामेही तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

कोट
महामार्गावर अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे विभाजक तुटलेले आहेत. काही ठिकाणी लोखंडी सळ्या अस्ताव्यस्त पडल्या आहेत. रात्रीच्या वेळी या अडथळ्यांवरील रेडियम पट्टेही स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे रात्री वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते.
- सुयश घारपुरे, वाहनचालक

महामार्गावर सध्या विविध कामे सुरू आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने काही ठिकाणी राहिलेली कामेही लवकरच हाती घेण्यात येतील.
- सुहास चिटणीस, महामार्ग प्रबंधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठ महामार्गावरून शिंदे सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर

Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या पुस्तकाने रचले विक्रीचे नवे विक्रम! तब्बल 'एवढ्या' कोटींचा झाला व्यवसाय

SCROLL FOR NEXT