मुंबई

पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कुटुंबासह कॅशलेस आरोग्य विमा मिळणार

CD

पालिका कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षेची आस
कॅशलेस विमा लागू करण्यासाठी युनियनचे महापौरांना निवेदन
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : पनवेल पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह कॅशलेस आरोग्य विम्याचे संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसह एकूण ९०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनने केली आहे. यासंदर्भात महापौर आणि आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, आरोग्य विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सुरक्षा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सध्या स्वतंत्र आरोग्य विम्याचे संरक्षण उपलब्ध नाही. गंभीर आजार, अपघात किंवा अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय उपचारांच्या वेळी कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक खर्चाचा सामना करावा लागतो. सध्या महापालिकेकडून वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती केली जाते, मात्र त्यासाठीची प्रक्रिया आणि खर्चाच्या मर्यादांमुळे उपचारांच्या वेळी आर्थिक अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत कॅशलेस आरोग्य विमा योजना अधिक उपयुक्त ठरू शकते. या योजनेमुळे मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचार घेताना कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम आगाऊ भरावी लागणार नाही.

यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून विमा कंपन्यांकडून प्रस्ताव मागवावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी महापौर कार्यालयामार्फत महापौर आणि आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले होते. अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या पात्र कुटुंबीयांनाही विमा संरक्षण मिळावे, अशी भूमिका त्यात मांडण्यात आली आहे.

प्रस्तावित विमा योजनेत मान्यताप्राप्त रुग्णालयांचे नेटवर्क, २४ तास हेल्पडेस्क, आरोग्य कार्ड, पूर्वविद्यमान आजारांवरील उपचार, अपघाती उपचार आणि प्रसूती खर्चाचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच विमा दाव्यांचे त्वरित निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

आता या प्रस्तावावर महापौर, आयुक्त आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यास महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य उपचारांसाठी मोठा आर्थिक आधार मिळू शकतो.

योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी
पनवेल नगर परिषद अस्तित्वात असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना लागू होती, मात्र १ ऑक्टोबर २०१६ रोजी महापालिका स्थापन झाल्यानंतर ही व्यवस्था बदलून वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची पद्धत सुरू झाली. त्यामुळे सध्याची प्रतिपूर्ती योजना कायम ठेवायची की कॅशलेस विमा योजना स्वीकारायची, याचा निर्णय घेण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी सूचनाही संघटनेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT