पालघर, ता. १८ (बातमीदार) : भारत निवडणूक आयोगाने १७ नाेव्हेंबरला निर्देशित केलेल्या महाराष्ट्रासह सात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. त्यानुसार मतदार नोंदणीसंदर्भातील विविध कामांसाठी नव्याने कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, १८ नोव्हेंबरपर्यंत गणना अर्ज तयार करणे व त्यांची छपाई करण्यात येणार आहे. १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गणना अर्जांचे वितरण व संकलन केले जाईल, तर १० डिसेंबरपर्यंत हे अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
मतदार यादी पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर निश्चित करण्यात आली असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. हा सुधारित कार्यक्रम महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, दिल्ली, नागालँड, तेलंगणा, हरियाना आणि झारखंड येथे लागू राहणार आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी या प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे. विशेषतः मृत, दुबार नोंदणी झालेले आणि बाहेरगावी स्थलांतरित मतदारांच्या नोंदींबाबत आवश्यक माहिती व कागदपत्रे विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.