मुंबई, ता. १८ : महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पर्व असलेल्या मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाची दखल आता आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठावर घेण्यात आली आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित ‘साऊथ एशिया डेमोक्रसी कॉन्फरन्स २०२६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधक रवींद्र नन्नवरे यांनी नामांतर आंदोलनावर आधारित शोधनिबंध सादर केला.
‘द अनफिनिश्ड प्रॉमिस ऑफ डेमोक्रसी : द नामांतर आंदोलन, कास्ट अँड द स्ट्रगल फॉर डेमोक्रॅटिक इक्वॅलिटी इन महाराष्ट्र, इंडिया’ या शोधनिबंधातून त्यांनी नामांतर आंदोलनाचा सामाजिक, राजकीय आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अभ्यास मांडला. हे आंदोलन केवळ विद्यापीठाच्या नामांतरापुरते मर्यादित नसून सामाजिक प्रतिष्ठा, स्वाभिमान, समानता आणि घटनात्मक अधिकारांसाठीचा व्यापक संघर्ष असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या परिषदेत विविध देशांतील संशोधक, प्राध्यापक, कायदेतज्ज्ञ आणि नागरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दक्षिण आशियातील लोकशाही, मानवी हक्क आणि सामाजिक चळवळींवर या वेळी चर्चा झाली.
नन्नवरेंचा शैक्षणिक प्रवास संघर्षमय
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मोहरद गावचे रहिवासी असलेल्या नन्नवरे यांचा शैक्षणिक प्रवास संघर्षमय राहिला आहे. मुंबईतील निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे त्यांनी शिक्षण घेतले. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी शेतात तसेच हॉटेल आणि बिअर बारमध्ये काम करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सध्या स्वतंत्र संशोधक आणि ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई : कोलंबो येथे परिषदेत संशोधक रवींद्र नन्नवरे यांनी शोधनिबंध सादर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.