मुंबई

मोरबे धरणात ६०.६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा

CD

मोरबे धरणात ६०.६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा
गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात मोठी घट
वाशी, ता. १८ (बातमीदार) ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट झाली आहे. बुधवारी (ता. १८) प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, धरणात ११५.७४४ दशलक्ष घनमीटर (६०.६३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या वापराचा वेग लक्षात घेता हा साठा २४१ दिवस म्हणजेच १७ जुलै २०२७ पर्यंत पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.
मोरबे धरणाची एकूण सकल साठवण क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर आहे. सध्या धरणात १४६.३४४ दशलक्ष घनमीटर सकल पाणीसाठा असून, त्याचे प्रमाण ७६.६६ टक्के आहे. मृतसाठा व मागील वर्षाचा शिल्लक साठा १९.९२ दशलक्ष घनमीटर असून, बाष्पीभवनामुळे १०.६८ दशलक्ष घनमीटर पाण्याची घट झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वापरासाठी ११५.७४४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. यंदा पावसानेही तुलनेने कमी हजेरी लावली आहे. नोव्हेंबर २०२६ पर्यंत मोरबे धरण क्षेत्रात ३,४९५.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ४,३२२.६० मिलिमीटर, तर २०२४ मध्ये ४,२८० मिलिमीटर पाऊस झाला होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. धरणातून दररोज सरासरी ०.४८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा होत असल्याने नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या तीन वर्षांतील पाणीसाठा (१८ नोव्हेंबरपर्यंत)
२०२४ : ७६.२९ टक्के (पाऊस : ४,२८० मिमी)
२०२५ : ७४.१५ टक्के (पाऊस : ४,३२२.६० मिमी)
२०२६ : ६०.६३ टक्के (पाऊस : ३,४९५.६० मिमी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठ महामार्गावरून शिंदे सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर

Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या पुस्तकाने रचले विक्रीचे नवे विक्रम! तब्बल 'एवढ्या' कोटींचा झाला व्यवसाय

SCROLL FOR NEXT