कामोठ्यात स्वच्छता मोहीम सुरू
प्रिया गोवारी यांच्या पाठपुराव्याला यश; साचलेला कचरा आणि सांडपाणी हटविण्याच्या कामाला वेग
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : कामोठे गाव परिसरातील अंतर्गत गल्ल्यांमध्ये साचलेला कचरा आणि तुंबलेल्या सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. ठाकरे गटाच्या नगरसेविका प्रिया गोवारी आणि युवा नेतृत्व सुनील (भाऊ) गोवारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर संबंधित परिसरात बुधवारी (ता. १८) स्वच्छतेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
कामोठे गावातील अंतर्गत गल्ल्यांमध्ये कचरा साचल्याने आणि सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या अस्वच्छतेमुळे रहिवाशांना दैनंदिन वावरताना त्रास सहन करावा लागत होता.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत प्रिया गोवारी आणि सुनील गोवारी यांनी संबंधित प्रशासनाकडे स्वच्छता करण्यासह सांडपाण्याचा निचरा सुरळीत करण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर प्रशासनाने संबंधित ठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. या वेळी शिवसैनिक जयेश जनार्दन गोवारी उपस्थित होते.
जनसेवेची बांधिलकी
नागरिकांच्या समस्या केवळ मांडून न थांबता, त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत प्रयत्नशील राहणे, हीच आमची जनसेवेची बांधिलकी आहे, असे नगरसेविका प्रिया सुनील गोवारी यांनी सांगितले. स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न कितपत सुटतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.