मुंबई

टीडीआरएफ जवानांना आता विमा कवच!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : आपत्कालीन वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना आता एक कोटींचे अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. सध्या असलेल्या २५ लाखांच्या विमा संरक्षणात तब्बल चार पट वाढ करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. आयुक्तांनी या प्रस्तावाला मान्यता दिली असून, अंतिम मंजुरीसाठी तो महासभेपुढे ठेवण्यात आला आहे.

महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण केलेले २८ जवान या दलात कार्यरत आहेत. शहरात पूरस्थिती निर्माण होणे, इमारती कोसळणे, आगीच्या दुर्घटना किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास हे जवान तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बचाव आणि मदतकार्य करतात. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचविण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते.

अधिकाऱ्यांनाही विम्याचे संरक्षण
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रमुख म्हणून काम पाहतात. आपत्कालीन घटनांच्या वेळी त्यांनाही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचे नियोजन आणि नियंत्रण करावे लागते. त्यामुळे जवानांप्रमाणेच त्यांनाही जीविताचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संवर्गाचाही समूह अपघात विमा योजनेत समावेश करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

विम्यासाठी ११ लाखांचा खर्च
सध्याच्या विमा योजनेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत असल्याने तिचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. वाढीव विमा संरक्षणासह नूतनीकरणासाठी ११ लाखांचा विमा हप्ता अपेक्षित आहे. हा खर्च महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या लेखाशीर्षातून करण्यात येणार आहे. आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर आता हा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यास आपत्तीच्या काळात नागरिकांसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या जवानांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना एक कोटींचे विमा कवच मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या पुस्तकाने रचले विक्रीचे नवे विक्रम! तब्बल 'एवढ्या' कोटींचा झाला व्यवसाय

Pune Water Scarcity : तर पुणेकरांवर तीव्र पाणीकपातीचे संकट येईल - प्रशांत जगताप

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठ महामार्गावरून शिंदे सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर

'शुटिंगवेळी दुखापत झाली अन् ' महेश लिमयेंनी सांगितला अशोकमामांचा सेटवरचा प्रसंग, म्हणाले... '5 दिवस त्यांना...'

SCROLL FOR NEXT