मुंबई

जुईनगरमध्ये तोतया पोलिसांचा डाव

CD

जुईनगरमध्ये तोतया पोलिसांचा डाव
सुयोग सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर महिलेची सोनसाखळी पळवली
जुईनगर, ता. १८ (बातमीदार) : पोलिस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी महिलेची सोनसाखळी लंपास केल्याची घटना बुधवारी (ता. १८) सकाळी जुईनगर येथे घडली. सुयोग सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दोघांनी महिलेचा विश्वास संपादन करून तिला बोलण्यात गुंतवले आणि संधी साधत गळ्यातील सोनसाखळी घेऊन पलायन केले. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जुईनगर येथील सुयोग सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर संबंधित महिला असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. आपण पोलीस असल्याचे भासवून त्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिला संवाद साधत असतानाच चोरट्यांनी संधी साधली. काही क्षणांतच सोनसाखळी लंपास करून दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलेला सावरण्याची संधीही मिळाली नाही.

गजबजलेल्या मार्गावर चोरी
सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरच चोरी झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तोतया पोलिसांकडून नागरिकांचा विश्वास संपादन करून दागिने लंपास करण्याच्या प्रकाराबाबतही चिंता व्यक्त होत आहे. या घटनेतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच जुईनगर परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. अनोळखी व्यक्तींनी पोलीस असल्याचे सांगितल्यास त्यांच्या ओळखीची खातरजमा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठ महामार्गावरून शिंदे सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर

Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या पुस्तकाने रचले विक्रीचे नवे विक्रम! तब्बल 'एवढ्या' कोटींचा झाला व्यवसाय

SCROLL FOR NEXT