मुंबई

रुग्णालयांवर करडी नजर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : सरकारच्या आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. या योजनेत समाविष्ट असूनही रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या, योजनेची माहिती दर्शविणारे फलक न लावणाऱ्या आणि योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर अचानक तपासणी करून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिला.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. १८) आयुष्मान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची संयुक्त आढावा बैठक झाली. यावेळी रुग्णालयांच्या अडचणी, लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आणि योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर चर्चा करण्यात आली. रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावेत, यासाठी सरकारकडून योजना राबविल्या जात असताना त्याच योजनेतील रुग्णांना उपचारांसाठी नकार मिळत असल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. काही खासगी रुग्णालये आयुष्मान कार्डधारक रुग्णांना योजनेअंतर्गत उपचार देण्यास प्राधान्य देत नसल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.

मोठ्या रुग्णालयांमध्येही योजनेची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावले जात नसल्याबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, योजनेच्या अंमलबजावणीवर आता ऑनलाइन पद्धतीने नियंत्रण ठेवले जात आहे. टीएमएस २.० पोर्टलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार नाकारणे किंवा क्लेम प्रक्रियेत गैरप्रकार करणे पूर्वीप्रमाणे शक्य राहिलेले नाही. प्रत्येक व्यवहाराची नोंद ऑनलाइन होत असल्याने पारदर्शकता वाढली आहे.

सहा तासांत मंजुरी मिळणार
आयुष्यमान योजनेअंतर्गत उपचारांच्या पूर्वमंजुरीसाठी सहा तासांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित क्लेम मंजूर किंवा नामंजूर न झाल्यास नियमानुसार त्याला स्वयंचलित मंजुरी मिळण्याची तरतूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयांनी आवश्यक कागदपत्रे आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यास क्लेमची रक्कम मिळण्याची प्रक्रियाही ऑनलाइन आणि पारदर्शक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. काही रुग्णालयांना क्लेमच्या रकमेपैकी केवळ २५ ते ३० टक्केच पैसे मिळतात आणि त्यामुळे ते उपचार देण्यास टाळाटाळ करतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळला.

७० टक्के लाभार्थ्यांची कार्डे नाहीत
ठाणे जिल्ह्यात आयुष्मान योजनेचे एकूण ५६ लाख ९६ हजार लाभार्थी असून, केवळ १६ लाख ३७ हजार लाभार्थ्यांची कार्डे तयार झाली आहेत. म्हणजेच सुमारे ३० टक्के नागरिकांकडेच आयुष्मान कार्ड उपलब्ध असून, उर्वरित ७० टक्के लाभार्थ्यांनी अद्याप कार्ड काढलेले नाही.

तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सॲप सुविधा
योजनेअंतर्गत उपचार नाकारणे, रुग्णालयांकडून अडवणूक करणे किंवा अन्य गैरप्रकार घडल्यास नागरिकांना तक्रार करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल, रुग्णालयांमधील क्यूएसके केंद्रे आणि टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी १८०० २३३ २२ ०० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. तसेच आयुष्मान सारथी या व्हॉट्सॲप सुविधेच्या माध्यमातून कार्ड तयार करणे आणि तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

नोटीस बजावण्याचे निर्देश
या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी गैरहजर असल्याचे निदर्शनात आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची देयके रोखण्याचे निर्देश शेटे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप-शिवसेना कार्यालयांवर म्हाडाचा हातोडा; कारवाईवरून पदाधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

Instagram Algorithm Update India : इन्स्टाग्रामवर आता अश्लील आणि हिंसक कंटेंट दिसणार नाही? मेटाचा भारतात मोठा निर्णय

Panchganga Sugar Factory : पंचगंगा शुगरकडून ३३०० रुपयांची पहिली उचल घोषित; टप्प्याटप्प्याने ३५०० रुपयांपर्यंत भाव देणार; इतर कारखानदारांनी भूमिका न घेतल्याने शेतकरी आक्रमक

Latest Marathi News Live Update : वाघोली परिसरात चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात नववा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT