निवारा शेड कोसळून १७ साईभक्त जखमी
शहापूर, ता. १८ (वार्ताहर) : वासिंद गाव व परिसरातील साईभक्त शिर्डीतील श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी पालखी घेऊन पायी चालत निघाले असता मंगळवारी (ता. १७) रात्री विसाव्यासाठी थांबलेल्या ठिकाणी अचानक निवारा शेड कोसळल्याने १७ जण जखमी झाले. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. ही घटना कसारा घाटमाथ्यावरील मानस मंदिरजवळ घडली. जखमींवर रात्रीच जवळच्या रुग्णालयात तसेच शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
वासिंद गाव आणि परिसरातील सुमारे ४०० साईभक्त दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पायी चालत पालखी घेऊन शिर्डीच्या दिशेने निघाले आहेत. प्रवासादरम्यान त्यांचा दुसरा मुक्काम कसारा घाटावरील साईभक्त निवासात होता. दिवसभराचा पायी प्रवास पूर्ण करून सर्व भक्त रात्री निवासाच्या ठिकाणी पोहोचले होते. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर काही साईभक्त आराम करत होते, तर काही जण झोपण्याच्या तयारीत होते. अशातच अचानक निवारा शेड कोसळून तेथे उपस्थित असलेल्या भक्तांवर कोसळली. या अनपेक्षित घटनेमुळे झोपण्याच्या तयारीत असलेल्या भक्तांमध्ये मोठी धावपळ उडाली. शेडच्या खाली अडकलेल्या आणि जखमी झालेल्या भक्तांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत एकूण १७ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन भक्तांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर तीन जणांना फ्रॅक्चर झाले आहे. उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.