मुंबई

युरोपवारीपूर्वी पर्यटकांना मिळणार मार्गदर्शन

CD

ठाणे, ता. १८ : पर्यटन क्षेत्रातील ३२ वर्षांचा अनुभव असलेल्या मँगो हॉलिडेजच्या वतीने युरोप सहलीसाठी इच्छुक पर्यटकांना विनामूल्य मार्गदर्शन सत्र घेण्यात आले आहे. येत्या रविवारी (ता. २२) सायंकाळी ५ वाजता ठाणे पश्चिम येथील तृप्ती बँक्वेट हॉलमध्ये हे सत्र होणार आहे.
मँगो हॉलिडेजचे संचालक मिलिंद बाबर यांच्या नेतृत्वाखालील या संस्थेने आतापर्यंत युरोपच्या २५९ यशस्वी सहलींचे आयोजन केले आहे. एक लाखाहून अधिक मराठी कुटुंबांचा विश्वास संपादन केल्याचा संस्थेचा दावा आहे. प्रीमियम विमानसेवा, उत्तम हॉटेल्स, भारतीय भोजन, संपूर्ण स्थळदर्शन, पारदर्शक दर आणि प्रवासाचे नियोजन ही संस्थेच्या सहलींची वैशिष्ट्ये असल्याचे सांगण्यात आले.
युरोपमधील माउंट टीटलीस आणि आयफेल टॉवर यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांसोबतच तेथील भौगोलिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांची माहितीही पर्यटकांना दिली जाते. युरोपमधील स्थानिक परंपरा आणि संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी सहलीत मिळते. मार्गदर्शन सत्रात युरोपमधील पर्यटनस्थळे, तेथील हवामान, चालण्याचे प्रमाण, प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी, वैद्यकीय अडचणी आणि औषधोपचार यांसह विविध विषयांवर माहिती दिली जाणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रातील फसव्या जाहिराती ओळखून त्यापासून सावध कसे राहावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हे सत्र उपयुक्त ठरणार असल्याचे बाबर यांनी सांगितले. यावेळी सहलीसाठी नोंदणी करणाऱ्यांना विशेष सवलतींच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. युरोप सहलीसाठी इच्छुक ठाणेकरांनी या विनामूल्य मार्गदर्शन सत्रासाठी नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन मँगो हॉलिडेजच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण : तृप्ती बँक्वेट हॉल, एम.आय. हायस्कूलच्यावर, ठाणे पश्चिम
दिनांक व वेळ : रविवार, २२ नोव्हेंबर, सायंकाळी ५ वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप-शिवसेना कार्यालयांवर म्हाडाचा हातोडा; कारवाईवरून पदाधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

Instagram Algorithm Update India : इन्स्टाग्रामवर आता अश्लील आणि हिंसक कंटेंट दिसणार नाही? मेटाचा भारतात मोठा निर्णय

Panchganga Sugar Factory : पंचगंगा शुगरकडून ३३०० रुपयांची पहिली उचल घोषित; टप्प्याटप्प्याने ३५०० रुपयांपर्यंत भाव देणार; इतर कारखानदारांनी भूमिका न घेतल्याने शेतकरी आक्रमक

Latest Marathi News Live Update : वाघोली परिसरात चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात नववा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT