यंदाच्या एमबीबीएस,
बीडीएसचे प्रवेश पूर्ण
एमबीबीएसच्या ३०, बीडीएसच्या २० जागा रिक्त
यंदाही शासकीय महाविद्यालयांकडे सर्वाधिक पसंती
मुंबई, ता. १८ : राज्य सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. राज्यातील १०० वैद्यकीय महाविद्यालयात ११ हजार ४८१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यापैकी ११ हजार ४३१ म्हणजे ९९.५६ टक्के विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. यावर्षी एकूण ५० जागा रिक्त राहिल्या आहेत. यंदाही शासकीय महाविद्यालयांकडेच विद्यार्थ्यांचा कल दिसून आला.
प्रवेशाच्या नऊ फेऱ्यांद्वारे एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाचे प्रवेश करण्यात आले. एमबीबीएसच्या ३०, बीडीएसच्या २० जागा रिक्त राहिल्या आहेत. दरम्यान, एमबीबीएस व बीडीएस प्रवेशादरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार सीईटी कक्षाकडे प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले. यावर्षी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने प्रवेशाच्या नियमात बदल केला व सर्व फेऱ्यांचे प्रवेश सीईटी कक्षाद्वारे करण्यात येतील, असा निर्णय घेतला हाेता.
त्यामुळे यावर्षी सीईटी कक्षाने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या व रिक्त जागांच्या तीन फेऱ्या झाल्या, या सहा फेऱ्यांनंतरही १३८ जागा शिल्लक राहिल्या होत्या. यानंतर एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वैद्यकीय समुपदेशन समिती, नवी दिल्ली यांनी जाहीर केलेल्या विशेष रिक्त जागा फेरीच्या वेळापत्रकानुसार तीन विशेष रिक्त जागा फेऱ्या आयोजित करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.