फादर स्टॅन स्वामीचा
जामीन अर्ज निकाली
निधनाच्या पाच वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : पुण्यातील भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांनी विशेष न्यायालयाच्या जामीन नाकारण्याच्या आदेशाविरुद्ध केलेली याचिका बुधवारी (ता. १८) उच्च न्यायालयाने निकाली काढली. स्वामी यांच्या निधनाला पाच वर्षे उलटल्यानंतर निर्णय देण्यात आला.
जुलै २०२१ मध्ये न्यायालयीन कोठडीत असताना स्वामी यांचे निधन झाले होते. त्यामुळे ही याचिका आता निरर्थक ठरल्याचे न्या. अजय गडकरी आणि न्या. अजय शर्मा यांच्या खंडपीठाने नमूद केले. स्वामी यांच्या निधनानंतर ही याचिका प्रलंबित ठेवण्यात कोणताही अर्थ उरत नाही; त्यानुसार न्यायालयाने ती निकाली काढली. ८४ वर्षीय धर्मगुरू आणि आदिवासी हक्क कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ऑक्टोबर २०२० मध्ये यूएपीएअंतर्गत अटक केली होती. ५ जुलै २०२१ मध्ये जामीन अर्ज मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत असतानाच मुंबईतील एका रुग्णालयात त्यांचे निधन झाले. पार्किन्सन आजाराने त्रस्त असल्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला होता. कोठडीत असताना झालेल्या त्यांच्या निधनामुळे मोठी खळबळ उडाली होती आणि त्यांना मिळालेल्या वागणुकीबाबत स्वतंत्र चौकशीची मागणीही करण्यात आली होती. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ मध्ये आयोजित ‘एल्गार परिषद’मध्ये केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांमुळेच दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार उसळला हाेता. या प्रकरणात एकूण १६ जणांना अटक केली होती. सध्या सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.