मुंबई

वृक्ष प्राधिकरण स्थापन करा!

CD

वृक्ष प्राधिकरण स्थापन करा!
ठाणे रिंग रोडप्रकरणी ठाणे पालिकेला आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः ठाणे रिंग रोड प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १८) आश्चर्य व्यक्त करताना जानेवारी महिन्यापासून वृक्ष प्राधिकरण का नेमले नाही, अशी विचारणाही केली. तसेच पुढील सुनावणीपर्यंत तत्काळ वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेशही ठाणे पालिकेला दिले.
ठाणे रिंग रोड प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या वृक्षतोडीच्या परवानग्यांविरोधात पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी ॲड. रोहित जोशी यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. ठाणे महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया डावलून मनमानी पद्धतीने ही परवानगी दिल्याचा आरोप याचिकेतून केला आहे. त्या याचिकेवर मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. त्या वेळी १६ जानेवारीपासून वृक्ष प्राधिकरण अद्यापही स्थापन करण्यात आले नसल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला दिली. त्यावर प्राधिकरण स्थापन का केले नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणे पालिकेच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली, मात्र ठाणे पालिका निर्णय का घेत नाही, प्रक्रिया जानेवारी महिन्यापासून सुरू आहे का, हा एका दिवसात सोडवला जाणारा मुद्दा आहे, त्यासाठी इतके महिने लागतात कसे, अशी प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने केली. तसेच पुढील तीन आठवड्यात वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने सुनावणी २१ डिसेंबरपर्यंत तहकूब केली.
...
आयुक्तांना मनाई
वृक्ष प्राधिकरण अस्तित्वात नसल्यास महापालिका आयुक्त २५हून अधिक वृक्षतोडीस परवानगी देऊ शकत नाही. असे असूनही आयुक्तांकडून २५हून अधिक वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर केल्याचीही खंडपीठाने दखल घेतली. त्याचप्रमाणे अधिकारक्षेत्राबाहेर वृक्षतोडीस परवानगी देण्यापासून आयुक्तांना मनाई केली. वृक्ष प्राधिकरण स्थापनेबाबतच्या आदेशाचा पूर्तता अहवाल पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिकेला दिले. तसेच या आदेशांनंतरही काही अनुचित निर्णय घेतले गेल्यास याचिकाकर्त्यांनी ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे तोंडी आदेशही न्यायालयाने दिले. 
...
याचिकेतील मुख्य मुद्दे
- महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन कायदा, १९७५ नुसार वृक्षतोडीचा निर्णय घेण्यासाठी ‘वृक्षप्राधिकरण’ स्थापन करणे बंधनकारक आहे, मात्र ठाणे महापालिकेने कायदेशीररीत्या वृक्ष प्राधिकरणाची स्थापना न करताच या परवानग्या दिल्याचा मुख्य आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
- या प्रकल्पाच्या मार्गावर ५१९ ते ५२० झाडे तोडण्यास आणि २,६९३ झाडांचे पुनर्रोपण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, अशाच प्रकारे ठाण्यात एकूण ४,६००हून अधिक झाडांना बाधा पोहोचवणाऱ्या परवानग्या देण्यात आल्याचे याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्तांनी १७ जूनला केलेला ठराव आणि त्यानंतर २४ ऑगस्टला वृक्षतोडीसाठी दिलेली अंतिम परवानगी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Fire : वलगाव मार्गावरील हबीब नगर परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता; अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण

Manchar News : मंचर नगरपंचायतीतील ठेकेदारांच्या बिलांचा प्रश्न ऐरणीवर; टक्केवारीच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची उपनगराध्यक्षांची मागणी

Sakal Karandak : ‘लाजाळू’ने पटकावला ‘सकाळ करंडक’; पुण्याला विजेतेपद; तर अहिल्यानगरला उपविजेतेपद

Maharashtra Court News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित; उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Balasaheb Thackeray Photo: फोटो फाडल्याच्या आरोपांवर शायना एनसींकडून स्पष्टीकरण; एकनाथ शिंदेही बोलले...

SCROLL FOR NEXT