मुंबई

डॉ. भीमराव आंबेडकर शनिवारी मुरबाडमध्ये

CD

मुरबाड, ता. १९ (वार्ताहर) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर शनिवारी (ता. २१) मुरबाड शहरात येणार आहेत. कुणबी समाज सभागृहात सकाळी ११ वाजता त्यांचे आगमन होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या मुरबाड तालुका शाखेच्या वतीने तयारी सुरू आहे. या निमित्ताने सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि संविधानिक मूल्यांचा जागर करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने मुरबाड तालुक्यात १२ ते २० नोव्हेंबरदरम्यान विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये न्हावे येथील नालंदा बुद्ध विहारात श्रामणेर शिबिर, वर्षावास प्रवचनमालिका आणि सांगता समारंभाचा समावेश होता. तसेच संविधान गौरवदिन आणि भव्य धम्मपरिषद होणार आहे. या वेळी आंबेडकरी चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
भगवान बुद्धांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतावादी विचार आणि भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये समाजात रुजविणे हा या सोहळ्यामागील मुख्य उद्देश आहे. सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तालुकाध्यक्ष ॲड. शरद थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमासाठी तालुका समिती आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter Glitch : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पंढरपूर दौऱ्यात परतीच्या प्रवासाआधीच मोठी धावपळ

Muslim Population: 2035 पर्यंत ख्रिश्चन धर्माला मागे टाकून इस्लाम सर्वात मोठा धर्म बनणार? प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल; भारतात काय परिस्थिती असेल?

Rickshaw Driver Agitation : रिक्षा संघटना एकवटल्या! बाईक, टॅक्सीविरोधात सोमवारपासून रिक्षाचालकांचे आंदोलन, परिवहनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

'2 Minutes 25 Seconds'चा हा व्हिडीओ 470 कोटी लोकांनी पाहिला; व्हिडिओत नेमकं आहे तरी काय?

Marathi News Live Updates : नागपुरात ठाकरे गट आक्रमक! बाळासाहेबांच्या फोटो विटंबनेविरोधात निषेध

SCROLL FOR NEXT