मुंबई

संविधान महासभेसाठी उल्हासनगरात देणगी संकलन

CD

उल्हासनगर, ता. १९ (बातमीदार) : भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानिक मूल्यांचे रक्षण आणि सामाजिक न्यायाचा विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी (ता. २५) मुंबईतील शिवाजी पार्क येथे संविधान सन्मान महासभा होणार आहे. या महासभेसाठी उल्हासनगरातील पक्षाचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने आर्थिक योगदान देत आहेत. महिला अध्यक्षा रेखा उबाळे आणि उपाध्यक्ष वंदना अवचार या पावती पुस्तकाद्वारे देणगी संकलन करत आहेत. तसेच भ्रमणध्वनीवरील क्यूआर संकेतांकाच्या माध्यमातूनही देणगी स्वीकारली जात असून, प्रत्येक देणगीदाराला पावती दिली जात आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही महासभा यशस्वी करण्यासाठी शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. महासभेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे यासाठी जनजागृती करणे आणि सभेचे नियोजन करणे यावर भर दिला जात आहे. कोणत्याही दबावाशिवाय कार्यकर्ते स्वेच्छेने आर्थिक योगदान देत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची हमी दिली आहे. या मूल्यांचे जतन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. हाच विचार महासभेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर मांडण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ, संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

SA vs BAN 1st Test : १२ धावांचे लक्ष्य अन् दक्षिण आफ्रिकेचा ९ चेंडूंत विजय! WTC Final च्या शर्यतीत मोठी उलथापालथ, भारताच्या स्वप्नांना धक्का; समजून घ्या गणित

पुण्यात झाडं न लावताच वाळली, साडेबारा कोटी खर्च; वृक्षारोपणात घोटाळ्याचा आरोप, वनमंत्री म्हणाले, 'कुणी केलं माहिती घेणार'

SIP Investment: SIP मध्ये पैसा कमवायचा असेल तर किती वर्षे गुंतवणूक करावी? 7 वर्षांचा नियम काय? रीपोर्टमधून मोठा खुलासा!

शर्ट काढून विवाहित अभिनेत्रीला मारली मिठी; सोडायला सांगूनही सोडेना, वर म्हणतो- किस करू का? भर कार्यक्रमात अभिनेत्याने ओलांडल्या मर्यादा

SCROLL FOR NEXT