मुंबई

बुवाबाजीविरोधात मुरबाडमध्ये वैचारिक जागर

CD

मुरबाड, ता. १९ (बातमीदार) : समाजातील अंधश्रद्धा, फलज्योतिष आणि बुवाबाजीविरोधात जनजागृती करून नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी शनिवारी (ता. २१) मुरबाड येथे संघर्ष परिषद घेण्यात येणार आहे. शहरातील कुणबी भवन येथे दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसात या वेळेत होणाऱ्या या परिषदेचे उद्‍घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते होणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने ही परिषद होणार आहे. यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध पैलूंवर चर्चा आणि वैचारिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या केंद्रीय सदस्य सुशीला मुंडे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत आणि प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांची व्याख्याने होणार आहेत. संकटाच्या काळात नागरिकांनी भूलथापांना बळी न पडता विज्ञान, वैद्यकीय उपचार आणि संविधानिक मूल्यांचा आधार घ्यावा, हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. चमत्कार समजल्या जाणाऱ्या घटनांकडे अंधविश्वासाने न पाहता जिज्ञासा, निरीक्षण आणि तर्कबुद्धीच्या आधारे त्यांची चिकित्सा करण्याची वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. मुरबाड तालुका कुणबी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष गणपत तात्या विशे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कल्याण शाखेचे अध्यक्ष डॉ. सुरेश कापरे यांनी ही माहिती दिली. या वेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड, तहसीलदार अभिजित देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन हुंदाळकर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव आरती नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

TB Free Vasai Virar : क्षयरोगाच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी वसई-विरार महापालिकेचा मोठा निर्णय; मुंबईला जाण्याची गरज कमी होणार

'नाना-नानी पार्क'मधील १८४ झाडांवर कुऱ्हाड; DDLJ अभिनेत्रीचा आक्रोश, बीएमसीवर टीका करत म्हणाली...

पुण्यात झाडं न लावताच वाळली, साडेबारा कोटी खर्च; वृक्षारोपणात घोटाळ्याचा आरोप, वनमंत्री म्हणाले, 'कुणी केलं माहिती घेणार'

Marathi News Live Updates : गडहिंग्लज तालुका अखेर दुष्काळग्रस्त घोषित

Strawberry Farming दुष्काळी परिस्थितीवर मात करत कौचलवाडीत दोन भावांचा स्ट्रॉबेरी लागवडीचा अभिनव प्रयोग; १० टन उत्पादन अपेक्षित!

SCROLL FOR NEXT