पनवेल, ता. १९ (बातमीदार) : नवोदित रंगकर्मींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारी प्रतिष्ठेची राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धा यंदा १३व्या वर्षांत पदार्पण करत असून, त्याचा महासंग्राम राज्यभर रंगणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १००हून अधिक एकांकिका संघांनी सहभाग नोंदवला आहे. २१ नोव्हेंबरपासून राज्यातील विविध केंद्रांवर प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होणार आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने आणि स्पर्धाप्रमुख नगरसेवक परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव येथे प्राथमिक फेऱ्या पार पडणार आहेत. तर ठाणे, पालघर, कल्याण, मुंबई आणि रायगड विभागासाठी पनवेल केंद्रावर स्पर्धा होईल.
महाअंतिम फेरी १८-२० डिसेंबरला
स्पर्धेची महाअंतिम फेरी १८ ते २० डिसेंबरदरम्यान आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगणार आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांकाला ७५ हजार, तर तृतीय क्रमांकाला ५० हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विविध विशेष पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. मराठी रंगभूमीला नवे कलाकार मिळावेत आणि नवोदितांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, हा स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.