मुंबई

उद्यानवासीयांचा स्थलांतराला विरोध

CD

उद्यानवासीयांचा स्थलांतराला विरोध
शिरढोण, खोणीतील पुनर्वसनाला विरोध; आमदार प्रकाश सुर्वे यांचा उपोषणाचा इशारा
मुंबई, ता. १९ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांचे मुंबईबाहेर पुनर्वसन करण्याच्या धोरणाविरोधात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १८) उद्यान प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. या प्रश्नी हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषण करण्याचा इशाराही सुर्वे यांनी दिला.
या उद्यानाच्या वनक्षेत्रात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आदिवासी, दलित आणि कष्टकरी कुटुंबांना मुंबईबाहेर कल्याणमधील शिरढोण आणि खोणी येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला विरोध करत रहिवाशांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. लढेंगे, मरेंगे मगर शिराढोण नहीं जायेंगे असा इशारा या वेळी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी दिला.‘आम्हाला मुंबईबाहेर पाठवू नका, मुंबईतच हक्काची घरे द्या’, अशी जोरदार मागणी या वेळी त्यांनी केली.
शिरढोण आणि खोणी येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्ताव जर वन विभागाने मागे घेतला नाही, तर उद्यानातील रहिवाशांसह येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला आपण आमरण उपोषण करू, असा इशाराही आमदार सुर्वे यांनी दिला.
येत्या २७ नोव्हेंबर रोजी उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत, स्थलांतर प्रस्तावाला विरोध करण्यात येईल. तसेच येथील बांधवांचे पुनर्वसन जवळपास करावे अशी मागणी करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आमची सदर भूमिका मांडण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत बैठकीत निर्णय होत नाही तोपर्यंत शिरढोण आणि खोणी येथे जाण्यासाठी येथील रहिवाशांची संमती पत्रे घेण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी सुर्वे तसेच नगरसेवक राज सुर्वे यांनी वनसंरक्षक अनिता पाटील यांच्याकडे केली.
या वेळी विभागप्रमुख वैभव भरडकर, नगरसेवक राज सुर्वे, महिला विभागप्रमुख मीना पानमंद, विभागप्रमुख मनोहर देसाई, प्रकाश पुजारी, नगरसेविका धनश्री भरडकर, नगरसेवक अदिती खुरसंगे,नगरसेवक मंगेश पांगारे,सचिन केळकर, आदिवासी नेते देवेंद्र ठाकूर,आरपीआयचे अशोक कांबळे, वैष्णवी पुजारी, शिवाजी शेंडगे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रोजगार, मुलांच्‍या शिक्षणाचे काय?
या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी वन विभागाने म्हाडाकडून कल्याणमधील शिरढोण आणि खोणी परिसरातील सुमारे ६,५०० सदनिका उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, मुंबईपासून दूर पुनर्वसन केल्यास रोजगार, मुलांचे शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली. त्यामुळे उद्यानापासून तीन ते चार किलोमीटरच्या परिसरातच पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी त्यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB Free Vasai Virar : क्षयरोगाच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी वसई-विरार महापालिकेचा मोठा निर्णय; मुंबईला जाण्याची गरज कमी होणार

'नाना-नानी पार्क'मधील १८४ झाडांवर कुऱ्हाड; DDLJ अभिनेत्रीचा आक्रोश, बीएमसीवर टीका करत म्हणाली...

पुण्यात झाडं न लावताच वाळली, साडेबारा कोटी खर्च; वृक्षारोपणात घोटाळ्याचा आरोप, वनमंत्री म्हणाले, 'कुणी केलं माहिती घेणार'

Marathi News Live Updates : गडहिंग्लज तालुका अखेर दुष्काळग्रस्त घोषित

Strawberry Farming दुष्काळी परिस्थितीवर मात करत कौचलवाडीत दोन भावांचा स्ट्रॉबेरी लागवडीचा अभिनव प्रयोग; १० टन उत्पादन अपेक्षित!

SCROLL FOR NEXT