मुंबई

खारघरमध्ये मतदारांच्या डेटा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ३,४०४ भरलेले अधिकृत एसआयआर फॉर्म झेरॉक्स करताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले; भाजप पदाधिकाऱ्यांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

CD

मतदारांच्या डेटा सुरक्षेचा प्रश्न
खारघरमध्ये एसआयआर फॉर्म झेरॉक्स करताना भाजप पदाधिकाऱ्याला पकडले

नवी मुंबई, खारघर, ता. २८ (वार्ताहर) : मतदारांच्या गोपनीय डेटाबाबत अत्यंत गंभीर प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत गोळा करण्यात आलेले मतदारांचे मूळ गोपनीय गणनापत्रक एका खासगी दुकानात अनधिकृतपणे झेरॉक्स करताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पनवेलचे नायब तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून सूरज पाटील याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर १९ मधील दुकानात गोपनीय एसआयआर फॉर्म मोठ्या प्रमाणावर झेरॉक्स केले जात असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी (ता. २७) सायंकाळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, महानगरप्रमुख ॲड. समाधान काशिद, बालेश भोजने यांच्यासह शिवसैनिकांनी त्या दुकानात धाव घेतली. त्या वेळी पाटील हा गणनापत्रकाचे हजारो फॉर्मच्या झेरॉक्स प्रती काढताना आढळला. यावरून दोन्ही गटांत बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला. याची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी पाटील याला ताब्यात घेतले. तसेच हजारो गणनापत्रक फॉर्म जप्त केले; मात्र पाटील हा संशयास्पदरीत्या पोलिस ठाण्यातून फरार झाल्याचा आरोप बालेश भोजने यांनी केला. तसेच शिवसैनिकांनी पोलिस ठाण्याच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या आदेशानुसार, नायब तहसीलदार सुनील जाधव यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने खारघर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांनी झेरॉक्स दुकानातून जप्त केलेल्या फॉर्मची तपासणी केली. त्यात १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध यादी भागांतील अधिकृत मूळ अर्ज असल्याचे निष्पन्न झाले. या फॉर्मवर मतदारांचे मूळ रंगीत फोटो, भरलेले तपशील आणि संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आढळल्या. याशिवाय भारत निवडणूक आयोगाचा लोगो व नाव असलेल्या आणि मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरावृत्ती लिहिलेल्या कापडी पिशव्या आढळल्या. महसूल विभागाने सर्व फॉर्म आणि साहित्य जप्त केले. त्यानंतर नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी खारघर मुर्बी गाव येथील भाजप पदाधिकारी सूरज पाटील याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पाच बीएलओ निलंबित
खारघरमधील ११ मतदान केंद्रांशी संबंधित एसआयआर फॉर्म झेरॉक्स सेंटरमध्ये आढळल्याची गंभीर दखल घेत रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी संबंधित पाच बीएलओंना निलंबित केले आहे.
------
खारघरमध्ये बीएलओच्या मदतीने बोगस नोंदणी केल्याचा संशय आहे. खारघरमधील सर्व केंद्रावर हे झाले असावे, अशी शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर यावे, यासाठी लढा देणार आहे.
- लीना गरड, नगरसेविका (ठाकरे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: रक्षाबंधनाच्या तोंडावर साखरेचे दर घसरले! किरकोळ बाजारातही मिळणार फायदा; सरकारच्या नव्या कोटा पद्धतीचा काय परिणाम होणार?

Bolero Bike Accident : टुणकी-लाडणापूर मार्गावर भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने बोलेरो पेटवली

Pune Traffic Update: पुण्यातील 'ट्रॅफिक'बाबत मोठी अपडेट! शहरातील 'मिसिंग रोड'च्या कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nepal Floods: नेपाळच्या महापुरात अजून किती भारतीय नागरिक बेपत्ता? MEA कडून मोठं अपडेट समोर; संपूर्ण आकडेवारी सांगितली!

Sonal Dinusha Story: रक्षाबंधन स्पेशल! बहिणीने उधार पैसे घेऊन दिली होती पहिली बॅट; आज त्याच भावाने भारताविरुद्ध गाजवलं नाव

SCROLL FOR NEXT