मुंबई

वजन काटा तपासण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाला २ लाखांचा गंडा! सोन्याची अंगठी आणि चेन घेऊन भामटा पसार;

CD

वजन काटा तपासण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाला दोन लाखांचा गंडा
सोन्याची अंगठी, चेन घेऊन भामटा पसार
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : वजन काटा तपासण्याच्या बहाण्याने एका भामट्याने रिक्षाचालकाजवळील तब्बल दोन लाख किमतीचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना वाशीतील कोपरीगाव परिसरात घडली. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू बचाटे हे घणसोली येथे राहण्यास असून, शुक्रवारी (ता. २८) ते नेहमीप्रमाणे आपली रिक्षा घेऊन व्यवसायासाठी निघाले होते. कोपरखैरणे येथील डी-मार्टजवळ भाड्याची वाट पाहत उभे असताना एक भामटा कोपरी गाव येथे जाण्यासाठी रिक्षात बसला. कोपरी गाव येथे पोहोचल्यानंतर त्याने बचाटे यांना ५०० रुपये देऊन त्यांना बेलापूर येथे जायचे असल्याचे सांगितले. भामट्याने उर्वरित रक्कम परत न घेता ती बचाटे यांना स्वतःकडे ठेवण्यास सांगितली. त्यानंतर वजन काटा आणण्याच्या बहाण्याने भामटा तेथून निघून गेला आणि काही वेळानंतर परत आला. त्यावर दागिन्यांचे वजन तपासण्याच्या बहाण्याने भामट्याने बचाटे यांच्या हातातील सोन्याची अंगठी मागितली. बचाटे यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अंगठी दिली. काही वेळात पुन्हा परत येत त्याने काटा तपासण्यासाठी किमान दोन तोळे सोने लागेल, असे सांगून बचाटेंकडे असलेली सोनसाखळी मागून घेतली. दागिने हातात येताच भामट्याने बचाटे यांना रिक्षा वळवण्यास सांगितली. यावेळी भामट्याने काही क्षणांत त्या ठिकाणावरून पलायन केले. बराच वेळ वाट पाहून आणि शोध घेऊनही भामटा परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे बचाटे यांच्या लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Officer Reshuffle: मोठा प्रशासकीय फेरबदल! ५६ बीएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

Divorce Maintenance : कर्मचाऱ्यांना झटका ! पत्नीला पोटगी दिली नाही तर थेट पगारातून कपात; सरकारचा मोठा निर्णय

Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

Bhimashankar Route: घोडेगाव-भीमाशंकर रस्ता खड्डेमय, अंगणवाडी पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करा : सुप्रिया सुळे

SCROLL FOR NEXT