मुंबई

एम पी एस सी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आंदोलन! रोहित पवारांचा बेलापूरमध्ये हल्लाबोल; एम पी एस सी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

CD

एमपीएससी अध्यक्ष राजीनामा द्या!
आमदार रोहित पवार यांची मागणी; आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला. भीमनवार यांच्यावर आरटीओ कार्यकाळातील कथित भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप असल्याचा दावा करीत, अशा व्यक्तीला एमपीएससीसारख्या महत्त्वाच्या पदावर ठेवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पवार यांनी मंगळवारी सीबीडी बेलापूर येथील एमपीएससी कार्यालयाला भेट देऊन सचिवांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करीत आंदोलन केले. तसेच अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली. गट-ब, तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेतील प्रश्न-उत्तरांबाबत विद्यार्थ्यांच्या शंका दूर कराव्यात, आरटीआय आणि ई-मेलला योग्य प्रतिसाद द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

एमपीएससी अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे पवार म्हणाले. भीमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जात नसल्याचा आरोप करीत, सरकारने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही पवार यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News : चारच्या पुढे बेस-टॉप असल्यास गुन्हा दाखल होणार; साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा

SCROLL FOR NEXT