मुंबई

सायन-पनवेल महामार्गावरील भीषण अपघात; केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सिडको अग्निशमन दलाचे जीवदान स्प्रेडर व हायड्रोलिक जॅकच्या साहाय्याने मध्यरात्री केले थरारक रेस्क्यू ऑपरेशन

CD

सायन-पनवेल महामार्गावरील भीषण अपघात
केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सिडको अग्निशमन दलाचे जीवदान; स्प्रेडर व हायड्रोलिक जॅकच्या सहाय्याने मध्यरात्री केले थरारक रेस्क्यू ऑपरेशन
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : सायन-पनवेल महामार्गावरील हिरानंदानीसमोरील उड्डाणपुलावर बुधवारी (ता. २) मध्यरात्री एका आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. अपघातात वाहनाची केबिन पूर्णपणे चेपल्याने चालक आतमध्ये गंभीररीत्या अडकून पडला होता. या चालकाला सिडको अग्निशमन दलाच्या खारघर केंद्रातील जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुरक्षितपणे बाहेर काढत जीवदान दिले.
वाशी येथील त्रिमूर्ती ट्रेडिंग अँड ट्रान्सपोर्ट कंपनीचा पनवेलच्या दिशेने जाणारा टेम्पो सायन-पनवेल हायवेवरील हिरानंदानीसमोरील उड्डाणपुलावर रस्ता दुभाजकाला धडकून आडवा झाला होता. यामुळे टेम्पोची केबिन पूर्णपणे चेपली गेल्याने चालक अस्लम खान हा केबिनमध्ये गंभीररीत्या अडकून पडला होता. याबाबतची माहिती मिळताच खारघर येथील सिडको अग्निशमन केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी जवानांनी स्प्रेडर उपकरणाच्या सहाय्याने वाहनाचा दरवाजा उघडून चालकाचा एक पाय मोकळा केला. त्यानंतर हायड्रोलिक जॅकच्या मदतीने अपघातात नुकसान झालेला स्टेअरिंग आणि केबिनचा भाग बाजूला करण्यात आला. यामुळे चालकाचा दुसरा पाय व शरीर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात जवानांना यश आले. जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर अस्लम खान यांना केबिनबाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान खारघर पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. या बचावकार्यात सिडको अग्निशमन दल, खारघर येथील प्रशांत दरेकर, जी. आर. तांडेल, जे. वाय. कोळी, के. वाय. पाटील, ए. एस. वाघ, एन. आर. पाटील (फायरमन) तसेच डी. डी. पाटील (यंत्रचालक) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मध्यरात्रीच्या काळोखात आणि अत्यंत बिकट परिस्थितीत केलेल्या या थरारक बचावकार्यात सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे गंभीर जखमी चालकाला वेळेत उपचार मिळणे शक्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT