एपीएमसी मार्केट परिसरात गांजाविक्री करणाऱ्या आरोपी अटकेत
८६ हजारांचा मुद्देमाल जप्त, एपीएमसी पोलिसांची कारवाई; मुख्य पुरवठादार मोहम्मद जावेदचा शोध सुरू
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : एपीएमसी मार्केट परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. बंटी फकिरा राठोड असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून ७५ हजार रुपये किमतीचा गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी बंटी फकिरा राठोड हा एपीएमसीतील मसाला मार्केट गेट क्र. ४ लगतच्या पदपथावरील झोपडीत राहण्यास आहे. बंटी राठोड हा एपीएमसी परिसरात गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २ सप्टेंबरला दुपारी त्याच्या झोपडीवर छापा टाकला. त्या वेळी बंटी राठोड हा संशयास्पदरीत्या मिळून आला. या वेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात एका काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरलेला १,५२५ ग्रॅम वजनाचा हिरवट-काळपट रंगाचा गांजा आढळून आला. बाजारात या गांजाची किंमत सुमारे ७५ हजार रुपये इतकी आहे. आरोपीविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल त्याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीच्या चौकशीत त्याला मोहम्मद जावेद हा गांजा पुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी मोहम्मद जावेद याच्या विरोधातही गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.