मुंबई

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा

CD

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा

नवी मुंबई पोलिसांकडून पहिलावहिला गुन्हा दाखल

विक्रम गायकवाड
नवी मुंबई, ता. ८ : १८ वर्षांवरील व्यक्ती बेपत्ता झाल्यास केवळ ‘मिसिंग’ नोंद न करता, परिस्थितीनुसार थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी पहिलावहिला गुन्हा दाखल केला आहे. एनआरआय सागरी पोलिस ठाण्यात ७ सप्टेंबरला भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणातील तक्रारदारांचा मुलगा चीन सीमेजवळ सैन्यात कार्यरत आहे. त्याची २३ वर्षीय पत्नी पतीसोबत फोनवर झालेल्या वादानंतर घरातून निघून गेली. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याने तिच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

सर्वोच्च न्यायालयाने २२ मे २०२६ रोजी बेपत्ता व्यक्तीची माहिती मिळताच एफआयआर नोंदवून तपास करण्याचे निर्देश दिले होते. ‘व्यक्ती’ या शब्दात केवळ अल्पवयीन नव्हे, तर सर्व नागरिकांचा समावेश होतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्देशांची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यांच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना अवमानाच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

पूर्वी केवळ ‘मिसिंग’ नोंद
यापूर्वी १८ वर्षांवरील व्यक्ती बेपत्ता झाल्यास पोलिस ठाण्यात प्रामुख्याने हरवल्याची नोंद केली जात होती. थेट अपहरणाचा गुन्हा दाखल होत नसल्याने तपासाची व्याप्तीही मर्यादित राहत होती. परिणामी, मोबाईल सीडीआर, तांत्रिक तपास आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर करण्यास विलंब होत असे. कुटुंबीयांना बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवावे लागत होते. मानवी तस्करी किंवा इतर गुन्हेगारी प्रकारांमध्ये प्रौढ व्यक्ती अडकण्याची शक्यता असतानाही सुरुवातीच्या टप्प्यात गुन्हा नोंद नसल्याने तपासाला अपेक्षित वेग मिळत नव्हता.

तस्करीला आळा घालण्यास मदत
कौटुंबिक वाद, नैराश्य, आर्थिक अडचणी तसेच मानवी तस्करी यांसारख्या विविध कारणांमुळे व्यक्ती बेपत्ता होतात. विशेषतः अल्पवयीन मुली व तरुणींचे अपहरण करून त्यांना बालमजुरी, अनैतिक व्यवसाय किंवा मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढण्याची प्रकरणे गंभीर आहेत. आता प्रौढ व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतरही परिस्थितीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने पोलिसांना तांत्रिक व फॉरेन्सिक तपासाला सुरुवातीपासूनच गती देता येणार आहे. त्यामुळे मानवी तस्करीसह बेपत्ता व्यक्तींशी संबंधित गुन्ह्यांवरही प्रभावीपणे कारवाईची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT