मुंबई

पनवेल मध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱया बोगस डॉक्टरचा पर्दाफाश आय जी हेल्थ केअर क्लिनिकवर प्रशासनाची धडक कारवाई; वैद्यकीय पदवी नसताना चालवत होता क्लिनिक

CD

पनवेलमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
आयजी हेल्थ केअर क्लिनिकवर प्रशासनाची धडक कारवाई
पनवेल, ता. ९ (वार्ताहर) : तालुक्यातील मौजे कळसखंड येथे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा परवाना नसताना रुग्णांवर सर्रास उपचार करणाऱ्या एका बोगस डॉक्टरचा आरोग्य विभाग आणि प्रशासकीय पथकाने पर्दाफाश केला आहे. नुरुल हुड्डा इमामुल हक (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो आय जी हेल्थ केअर नावाचे क्लिनिक चालवत होता. प्रशासनाने हे क्लिनिक सील करून आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पनवेल तालुक्यातील मौजे कळसखंड येथे नुरुल हुड्डा इमामुल हकने क्लिनिक सुरू केल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या आधारे आयुक्त व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अजीवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली मानकर आणि आरोग्यसेवक संकेत सागपेकर यांनी कळसखंड येथील संशयित आयजी हेल्थ केअर या क्लिनिक तपासणी मोहिमेअंतर्गत अचानक भेट दिली. या वेळी क्लिनिकमध्ये उपस्थित असलेल्या नुरुल हुड्डा इमामुल हक याच्याकडे चौकशी केली असता तो मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद येथील रहिवासी असल्याचे व सध्या कोन गाव येथील म्हाडा कॉलनीत राहत असल्याचे सांगितले. त्याच्या चौकशीत गेल्या दोन महिन्यांपासून तो त्या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली. त्याच्याकडे वैद्यकीय पदवीबाबत विचारणा केली असता, कोणतीही वैध वैद्यकीय पदवी, कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा शासकीय परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

औषधसाठा जप्त व क्लिनिक सील
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी बोगस डॉक्टर तपासी पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर या पथकाने क्लिनिकमधून विविध प्रकारच्या सिरप्स, गोळ्या, कॅप्सूल आणि ॲण्टीबायोटिक्स औषधांचा साठा जप्त केला. तसेच, त्याचे क्लिनिक सील केले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अजीवली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली मानकर यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT