वीजमीटर जोडणीसाठी १८ हजारांची लाच
महावितरणचा वायरमन जाळ्यात
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : वीजमीटरची पुन्हा जोडणी करून देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त १८ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या एका वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (ता. ९) सायंकाळी रंगेहाथ पकडले. रामेश्वर घनमोडे, असे अटक करण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या शेजारी राहणाऱ्या महिलेचा कॅन्टीन व पार्किंगचा व्यवसाय आहे. यासाठी महावितरणकडून वीजमीटर घेण्यात आले होते. वीजबिल थकीत राहिल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कॅन्टीनचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढून नेले होते. त्यानंतर संबंधित महिलेने थकीत वीजबिल भरून मीटर पुन्हा बसवून घेण्यासाठी तक्रारदाराला अधिकारपत्र दिले होते. त्यानुसार तक्रारदाराने या कामासाठी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) रामेश्वर घनमोडे याची भेट घेतली, परंतु घनमोडे यांनी मीटर पुन्हा जोडणी करण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त २० हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तडजोडीअंती १८ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यामुळे तक्रारदाराने नवी मुंबई एसीबीकडे याबाबत तक्रार केली होती. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची ३ सप्टेंबर रोजी पडताळणी केली व सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.