अपघातात मृत बँक अधिकाऱ्याच्या कुटुंबाला २.४० कोटींची भरपाई
राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात दावा प्रकरण सामंजस्याने निकाली
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : नेरूळ येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकाच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तब्बल दोन कोटी ४० लाखांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. शनिवारी (ता. १२) बेलापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीच्या कामकाजादरम्यान, मृताचे कायदेशीर वारसदार आणि संबंधित विमा कंपनी यांच्यात सामंजस्याने तोडगा निघाल्याने हा दावा यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आला.
नेरूळ परिसरातील सावली चौकाजवळ २२ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या रस्ते अपघातात एसबीआयचे व्यवस्थापक खुर्शीद अहमद यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमद यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे २५ लाख रुपये होते.
अचानक झालेल्या या अपघातामुळे कुटुंबाचा आधार गमावल्याने त्यांच्या कायदेशीर वारसांनी योग्य भरपाईसाठी वकिलांमार्फत मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. प्रकरण राष्ट्रीय लोकअदालतीसमोर आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने तोडगा काढण्यात आला.
लोकअदालतीच्या माध्यमातून झालेल्या तडजोडीनुसार मृत बँक अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना २.४० कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.