मुंबई

Revised News पार्किंगच्या क्षुल्लक वादातून नेरुळामध्ये तरुणाची कारखाली चिरडून हत्या! हॉकी स्टिकनेही हल्ला; दोघांना अटक, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू

CD

क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : गाडी पार्क करण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून चाैघांनी तरुणाची अंगावर कार घालून हत्या केली. ही घटना नेरूळमधील एका हॉटेलसमोर शनिवारी घडली. नेरूळ पोलिसांनी या हत्येचा तपास करत दोघांना रविवारी अटक केली, तर दोघांचा शोध सुरू आहे.
तक्रारदार आशुतोष मोरजकर (३३) हा शनिवारी मित्र मुबिन याच्यासोबत शिरवणे येथील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. मुबिनने त्याची दुचाकी हॉटेलसमोर पार्क केली होती. ऑर्डर दिल्यानंतर तो बाहेर सिगारेट ओढण्यासाठी गेला असताना कारमधून चार जण तेथे आले. त्यांनी पार्क केलेल्या दुचाकींना लाथा मारून त्या खाली पाडल्या. मुबिनने याबाबत जाब विचारला असता चौघांनी त्याच्याशी वाद घातला. मध्यस्थी करण्यासाठी कारजवळ गेलेल्या रणजीतसिंग दलजीत शेरगिल (३३) याच्या अंगावर चालकाने कार घातली. यात रणजीतसिंगचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी कारसह पसार झाले, मात्र काही वेळाने आरोपी पुन्हा हॉकी स्टिक घेऊन घटनास्थळी आले. त्यातील एकाने आशुतोषवर हॉकी स्टिकने हल्ला केल्यानंतर चौघेही फरार झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढत रविवारी रणजीतसिंग राम तायडे (३३) आणि कलीम शेख (३०) यांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT