मुंबई

परदेशी जहाजावर नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात आर्थिक गुप्तवार्ता युनिटची धडक कारवाई

CD

परदेशी जहाजावर नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणांची फसवणूक
दोघे अटकेत ः आर्थिक गुप्तवार्ता युनिटची धडक कारवाई
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : परदेशी जहाजांवर चांगल्या पगाराच्या नोकरीचे प्रलोभन दाखवून सुशिक्षित व बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या सीबीडी बेलापूर येथील एका कंपनीवर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता युनिटने धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. डी. जी. शिपिंगने परवाना रद्द केलेला असतानाही ही कंपनी अवैधपणे चालवून तरुणांची फसवणूक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी कंपनीच्या कार्यालयातून १२ तरुणांचे पासपोर्ट आणि १६ सीडीसी व इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
आरोपींमध्ये कंपनीचा संचालक वीरेंद्र सिंह आणि कर्मचारी संतोष चौधरी या दोघांचा समावेश आहे. यातील वीरेंद्र सिंह याने काही महिन्यापूर्वी सीबीडी बेलापूर सेक्टर-११मधील पुनीत टॉवर येथील ऑफिस नंबर २४ मध्ये आदिशक्ती शिप मॅनेजमेंट प्रा.लि. या नावाने कार्यालय सुरू केले होते. तसेच या माध्यमातून परदेशी जहाजांवर चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याबाबत जाहिरातबाजी सुरू केली होती. विशेष म्हणजे डी. जी. शिपिंगने या कंपनीचा परवाना रद्द केलेला असतानाही अवैधपणे कार्यालय सुरू ठेवून बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जात होती.

बोगस उमेदवार पाठवून पर्दाफाश
याबाबतची गोपनीय माहिती नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आर्थिक गुप्तवार्ता कक्षाला (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) मिळाल्यानंतर पथकाने बोगस उमेदवार म्हणून पोलिसाला पाठवले होते. या वेळी कंपनीच्या प्रतिनिधीकडून परदेशी जहाजावर नोकरी देण्याचे प्रलोभन दाखविण्यात येत असल्याचे तसेच त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर एफआययूच्या पथकाने या कार्यालयावर छापा मारून कंपनीच्या कारभाराची झाडाझडती घेतली. या तपासणीत कार्यालयात तरुणांचे १२ पासपोर्ट आणि १६ सीडीसी तसेच ३४ उमेदवारांनी नोकरीसाठी भेट दिल्याची नोंद असलेले रजिस्टर, कंपनी डायरेक्टर आणि आरपीएसएल परवान्याचे रबर स्टॅम्प आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT