विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल
पोलिस प्रशासनाचे कडक निर्देश; नागरिकांसाठी पर्यायी मार्ग घोषित
पनवेल, ता. १७ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर, खांदेश्वर आणि नवीन पनवेल परिसरात गणारायाच्या विसर्जन मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. विसर्जन मार्गांवर कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
ही वाहतूक बंदी १८, १९, २०, २३, २५ आणि ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत लागू राहील. या कालावधीत विसर्जन मार्गांवर गणेशमूर्ती वाहून नेणारी वाहने, पोलिस आणि अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
वाहतुकीतील प्रमुख बदल व पर्यायी मार्ग :
सावरकर चौक ते वडाळे तलाव (नागफणी) दोन्ही बाजूंच्या मार्गांवर प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग : सावरकर चौक ते कोर्ट रोड, सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल रोड आणि ठाणा नाका रोड.
राम स्नॅक्स कॉर्नर ते वडाळे तलाव : हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल.
पर्यायी मार्ग : राम स्नॅक्स कॉर्नर ते अशोक गार्डन, देशमुख गल्ली मार्गे सावरकर चौक.
खांदेश्वर व खांदा कॉलनी (खांदेश्वर तलाव परिसर) : त्रिमूर्ती सोसायटी (सेक्टर ८) व श्री कृपा बॅंक्वेट हॉल (सेक्टर ६) कडून तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर इतर वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग : ॲक्सिस बँकेकडून तलावाकडे जाणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने वळवण्यात येतील.
नवीन पनवेल (आदई तलाव परिसर) : तुलसी हाईट्स (सेक्टर ५) ते भावना मेडिकल मार्ग पूर्णपणे बंद.
पर्यायी मार्ग : डी-मार्ट, एचडीएफसी (HDFC) चौक किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलाचा वापर करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.