मुंबई

चिमुकल्याच्या साक्षीने आईच्या हत्येचा उलगडा

CD

चिमुकल्याच्या साक्षीने आईच्या हत्येचा उलगडा

पत्नीची हत्या करून घराजवळ पुरला मृतदेह; पतीसह मित्राला अटक

पनवेल, ता. १७ (वार्ताहर) : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीची हत्या करून मित्राच्या मदतीने मृतदेह घराजवळील खड्ड्यात पुरल्याची घटना गव्हाणफाटा येथे उघडकीस आली. पाच वर्षांच्या मुलाने सांगितलेल्या घटनाक्रमामुळे या हत्येचा उलगडा झाला. पनवेल शहर पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना मंगळवारपर्यंत (ता. २२) पोलिस कोठडी सुनावली आहे.
बिबीयाना सुशील हिरेन (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. ती गव्हाणफाटा पुलाखाली रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या झोपडीत राहत होती. पती सुशील सिमोन हिरेन (३५), मुलगा सोनू आणि पतीचा मित्र रमेश थमस एक्का (३२) हे तिच्यासोबत राहत होते. हे सर्वजण भंगार गोळा करून उदरनिर्वाह करीत होते. बिबीयाना आणि रमेश यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय सुशीलला होता. मंगळवारी रात्री बिबीयाना, सोनू आणि रमेश झोपले होते. त्या वेळी सुशील घरी आला. त्याने बिबीयानाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे तिचा मृत्यू झाला.

---
मृतदेहाचा हात बाहेर राहिल्याने घटना उघडकीस
बिबीयानाचा मृत्यू झाल्यानंतर सुशीलने रमेशच्या मदतीने तिचा मृतदेह घराजवळील खड्ड्यात टाकून त्यावर माती टाकली; मात्र मृतदेहाचा हाताचा काही भाग बाहेर राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा हात स्थानिक महिलेच्या निदर्शनास आला. तिने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर सुशील आणि रमेश यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सुशीलने मारहाणीत बिबीयानाचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
---
चिमुकल्याने सांगितला घटनाक्रम
तपासात पाच वर्षांच्या सोनूची माहिती महत्त्वाची ठरली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, वडील सुशील यांनी आई बिबीयानाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर सुशील आणि रमेश यांनी आईचा मृतदेह खड्ड्यात पुरल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे हत्येचा घटनाक्रम स्पष्ट होण्यास पोलिसांना मदत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT