मुंबई

इजिप्तवरुन ऑरेंजचे कंटेनर देण्याच्या बहाण्याने 25 लाखांची फसवणूक; एपीएमसी पोलीस ठाण्यात जळगाव येथील व्यापाऱयावर गुन्हा दाखल

CD

इजिप्तवरून संत्र्यांचे कंटेनर देण्याच्या प्रलोभनातून २५ लाखांची फसवणूक
एपीएमसी पोलिस ठाण्यात जळगाव येथील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : इजिप्तमधून आयात केलेले फळांचे तीन कंटेनर देण्याचे प्रलोभन दाखवून फळ आयात-निर्यात करणाऱ्या कंपनीची तब्बल २५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव येथील व्यापारी भरत लालवाणी याच्या विरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
रजनीश कुमार राजपूत हा फळाच्या आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्या वास्मी फार्म फ्रेश प्रा.लि. कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. या कंपनीचे एपीएमसीत कोल्ड स्टोरेज आहे, तर भरत लालवाणी हा जळगाव येथील श्री ॲग्रो कंपनीचा मालक आहे. एप्रिल २०२५ मध्ये रजनीश कुमार याने लालवाणी याच्याकडून तब्बल ६३ लाख ४७ हजार रुपये किमतीचे सफरचंद खरेदी केले होते. त्या वेळी लालवणी याने व्यवहार पूर्ण केला होता. त्यामुळे रजनीश कुमार याचा लालवाणी याच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर लालवाणीने रजनीश यांना इजिप्तमधून संत्र्यांचे तीन कंटेनर माल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. या व्यवहारापोटी लालवाणी याने रजनीश कुमार याच्या कंपनीकडून ३० लाखांची रक्कम आगऊ म्हणून घेतली होती, मात्र करारानुसार आणि मुदतीत लालवाणी याने रजनीश कुमार याला कोणताही माल पुरवला नाही. तसेच घेतलेली रक्कमसुद्धा परत केली नाही. त्यामुळे रजनीश कुमार यांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर लालवाणी याने पोलिसांसमोर पाच लाखांची रोख रक्कम रजनीश कुमार याला दिली. तसेच उर्वरित रक्कम नंतर देण्याचे पोलिसांसमोर कबूल केले, मात्र त्यानंतर लालवाणी याने आजपर्यंत उर्वरित २५ लाखांची रक्कम परत केली नाही. अखेर रजनीश कुमार याने पुन्हा एपीएमसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT