मुंबई

तीन व्यावसायिकांना कोटींचा गंडा

CD

तीन व्यावसायिकांना कोटींचा गंडा

नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : झारखंड आणि पंजाबमध्ये मायनिंग व ट्रान्स्पोर्टचा मोठा व्यवसाय असल्याचे भासवून आकर्षक नफ्याचे प्रलोभन दाखवत तीन व्यावसायिकांकडून एक कोटी ४५ लाख ५१ हजार रुपये उकळणाऱ्या नीलम शर्मा (वय ५२) हिला एनआरआय पोलिसांनी दिल्लीतील गाझियाबाद येथून अटक केली. तिचा पती हरिशंकर पांडे अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सीबीडी बेलापूर येथील शिपिंग व्यावसायिक संजय राय यांची फेब्रुवारी २०२५ मध्ये पांडे व शर्मा यांच्याशी ओळख झाली. देशभरात ट्रान्स्पोर्ट व शिपिंगचा मोठा व्यवसाय असल्याचे सांगून त्यांनी राय यांचा विश्वास संपादन केला. मायनिंग व अन्य व्यावसायिक कारणांसाठी घेतलेली रक्कम काही दिवसांत परत करण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून विविध टप्प्यांत ४६ लाख ८७ हजार रुपये घेतले; मात्र मुदत उलटूनही पैसे परत न करता टाळाटाळ केली. पैसे मागितल्यावर राय यांना शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तपासात गणेश पाटील यांच्याकडून ६२ लाख १४ हजार आणि संतोष घरत यांच्याकडून ३६ लाख ५० हजार रुपये अशाच प्रकारे घेतल्याचे समोर आले. राय यांच्या तक्रारीवरून एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शनिवारी (ता. १९) तिला नवी मुंबईत आणून न्यायालयात हजर केले असता २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फरार पतीचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT