नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : क्रेडाई एमसीएचआय युथ ‘एनएमआर’च्या वतीने नवी मुंबईतील पुनर्विकासासंदर्भात सोसायटींना मार्गदर्शन करण्यासाठी एकदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २७ सप्टेंबरला वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित या एकदिवसीय प्रदर्शनात ४०हून अधिक विकसक सहभागी होणार आहेत, तर या प्रदर्शनाला नवी मुंबई व रायगडमधील शेकडो गृहनिर्माण सोसायटींचे पदाधिकारी भेट देण्याची अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त केली जात आहे.
जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करताना विविध पर्यायांचा अभ्यास, विकासकाची निवड, तांत्रिक व कायदेशीर बाबी, सभासदांशी चर्चा आणि सामूहिक निर्णयप्रक्रिया अशा अनेक टप्प्यांचा समावेश असतो. या पार्श्वभूमीवर सोसायटी पदाधिकाऱ्यांना आणि घरमालकांना पुनर्विकास प्रक्रियेची माहिती मिळावी, विविध विकासकांशी थेट संवाद साधता यावा आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, हा ‘इज ऑफ डुईंग बिझनेस २.०’चा उद्देश असल्याचे विकसक अमित हावरे यांनी सांगितले.
या प्रदर्शनात पुनर्विकासाच्या विविध पैलूंवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी सोसायटी प्रतिनिधी आणि मालमत्ताधारकांना तज्ज्ञांसोबत थेट चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. सोसायटीधारकांनी पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सोसायटी, विकसक आणि तज्ज्ञांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.