मुंबई

बनावट नंबर प्लेट लावून विनयभंग करणारा थार चालक १० तासांत जेरबंद

CD

बनावट नंबर प्लेट वापरून तरुणीचा विनयभंग
१० तासांत आरोपी गजाआड
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : चारचाकीवर बनावट नंबर प्लेट लावून तरुणीचा भररस्त्यात विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष-३च्या पथकाने आरोपीला अवघ्या १० तासांत बेड्या ठोकल्या. अली ऊर्फ तालिब अहसन नखवी असे आरोपीचे नाव आहे.
अली बुधवारी (ता. ३०) चारचाकी घेऊन खारघरमध्ये गेला होता. या वेळी त्याने पेठपाडा मेट्रो स्थानकावरून पायी चालत जात असलेल्या एका तरुणीचा विनयभंग करून पलायन केले. खारघर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष-३चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनाचा शोध सुरू केला होता. यादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्हीमध्ये चारचाकीची नंबर प्लेट दिसून आली. दरम्यान, आरटीओकडून या क्रमांकाची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणच्या सीसीटीव्हींचा मागोवा घेतला. अखेर पोलिसांनी अली याला कोपरखैरणेतील बोनकोडे गावातून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर गुन्ह्यातील त्याचा सहभाग समोर आला. तसेच त्याने त्याच रात्री एका तरुणीला चारचाकीने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचेदेखील उघडकीस आले. पोलिसांनी त्याला कायदेशीर कारवाईसाठी खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT