मुंबई

गांजा लपवून तळोजा कारागृहात जाणाऱया आरोपीला पकडले कारागृह पोलिसांच्या झडतीत झाला प्रकार उघडकीस

CD

कारागृहात गांजा नेण्याचा प्रयत्न उधळला
तळोजा कारागृहात आरोपीकडून पाच ग्रॅम गांजा जप्त; खारघर पोलिसांकडून गुन्हा दाखल

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : तळोजा मध्यवर्ती कारागृहात दाखल होताना चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीने गांजा शरीराच्या अंतर्वस्त्रात लपवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या अंगझडतीत आरोपीकडून पाच ग्रॅम गांजा आणि तो लपविण्यासाठी वापरलेले सुमारे तीन ग्रॅम काळ्या रंगाचे सेलो टेपचे तुकडे कारागृह पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी खारघर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सेहेद मोहम्मद सुधू शाह ऊर्फ सज्जू (वय २६) असे आरोपीचे नाव असून, तो दक्षिण दिल्ली येथील आहे. सध्या तो नेरळ, कर्जत येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी (ता. ४) कळंबोली पोलिसांनी त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सोमवारी (ता. ५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास तळोजा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.

कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी नियमानुसार कैद्यांची अंगझडती घेतली जात होती. त्या वेळी कारागृह हवालदार ज्ञानेश्वर सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याची कसून तपासणी करण्यात आली. त्या वेळी आरोपीने अंतर्वस्त्रात लपवून आणलेला सुमारे पाच ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच गांजा लपविण्यासाठी वापरलेले काळ्या रंगाचे सेलो टेपचे तुकडेही जप्त करण्यात आले. जप्त गांजाची किंमत सुमारे ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारागृहाच्या सुरक्षेला बगल देऊन अमली पदार्थ आत नेण्याचा प्रयत्न अंगझडतीमुळे उधळला गेला. त्यानंतर कारागृह प्रशासनाने सेहेद मोहम्मद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने गांजा कुणाकडून मिळवला, याबाबतचा तपास खारघर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Net Worth: राहुल गांधींकडे नेमकी संपत्ती किती? ऑफीस 'एवढ्या' कोटींचं! शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक

Pune News : औंधमध्ये पोलिस उपनिरीक्षकाने संपविले जीवन; राहत्या घरी शासकीय पिस्तुलातून झाडली गोळी

Numerology: 'या' मूलांकाच्या दीर-वहिनीची जोडी का मानली जाते नंबर वन? नात्यात असते हसणे, चिडवणे, प्रेम अन् विश्वास...

गरबा आणि दांडिया एकच नाही! दोन्ही नृत्यप्रकार करण्याचीही आहे वेगवेगळी वेळ; जाणून घ्या नेमका फरक काय

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

SCROLL FOR NEXT