मुंबई

जेएनपीटी कस्टमची वेबसाइट बंद पडणाऱया इंजिनियरचा पोलिसांकडुन शोध सुरू

CD

जेएनपीटी कस्टमची वेबसाइट बंद
इंजिनिअरचा पोलिसांकडून शोध सुरू


नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) कस्टम विभागाच्या शासकीय नेटवर्क आणि वेबसाइटमध्ये एका खासगी कंपनीच्या इंजिनिअरने अनधिकृतरीत्या वेबसाईट दोन वेळा ठप्प केल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे कस्टम विभागातील संगणक प्रणालीच्या आयसीईएस सिस्टीमवर परिणाम झाला. त्यामुळे कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला. यानंतर कस्टम विभागाने शोध घेत एरियल टेलिकॉम सोल्यूशन्स (एटीए) या कंपनीच्या रेसिडेंट इंजिनिअरविरोधात न्हावा शेवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सुरेंद्र भाटीकरे (४८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो न्हावा शेवा येथील एरियल टेलिकॉम सोल्यूशन्स या कंपनीत रेसिडेंट इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. भाटीकरे याने २४ जुलैला सकाळी ९.५१ वाजता तसेच १ ऑगस्टला जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) कस्टम विभागाच्या शासकीय नेटवर्क आणि वेबसाइटच्या संगणक प्रणालीमध्ये हस्तक्षेप केला. त्यामुळे कस्टमची वेबसाईट ठप्प पडली. यामुळे कस्टमच्या आयसीईएस सिस्टीमवर परिणाम झाला.

न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरू कस्टम हाउसच्या दुसऱ्या मजल्यावरील बी-२०४ या कार्यालयात हा प्रकार घडल्याचे कस्टमने केलेल्या चौकशीत निदर्शनास आले. एरियल टेलिकॉम सोल्यूशन्स या कंपनीतील रेसिडेंट इंजिनिअर सुरेंद्र भाटीकरे याने हा प्रकार केल्याचे आढळून आल्यानंतर कस्टम विभागाच्या वतीने मयंक गर्ग (२६) यांनी न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुरेंद्र भाटीकरे (४८) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीचा छेडछाड करण्यामागे नेमका काय उद्देश होता, सिस्टीम बंद पडल्याने कोणत्या कामकाजावर परिणाम झाला आणि या प्रकारामागे अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबतचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT