मुंबई

विमानतळावरील केबल चोरीप्रकरणातील आरोपीचा लॉकअपमध्ये मृत्यू! हात-पाय वाकडे होऊ लागल्यानंतर रुग्णालयात हलविले; उपचारादरम्यान ३८ वर्षीय संजय यादवचा मृत्यू

CD

केबल चोरी करणाऱ्या आरोपीचा
पोलिस कोठडीत मृत्यू

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात इलेक्ट्रिकचे काम सुरू असताना केबल चोरी झाली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली होती. अटकेतील आरोपी संजय कंटू यादव (३८) याची अचानक प्रकृती बिघडल्याने (गुरुवारी ता. ८) त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संजय यादव वाराणसीचा रहिवासी असून, सध्या तो उलवे येथे राहत होता. जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे इलेक्ट्रिक केबलच्या चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी यादव याला ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. अटकेपूर्वी त्याची पनवेल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली होती. त्यानुसार एनआरआय सागरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत यादवला ठेवण्यात आले होते. बुधवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचालींमुळे त्याची प्रकृती बिघडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला तातडीने नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी यादवला उपचारादरम्यान पहाटे मृत घोषित केले. वैद्यकीय तपासणीच्या वेळी आरोग्याबाबत यादवने कोणतीही तक्रार अथवा आजाराचा पूर्व इतिहास सांगितला नसल्याचे पोलिसांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पेपरफुटीला १० कोटींचा दंड! परीक्षा दिल्यास शुल्कही परत मिळणार

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ साठी राजगड तालुक्यात कोट्यवधींचा निधी; आडवली-वेल्हे रस्त्याच्या कामात त्रुटी असल्याचा नागरिकांचा आरोप

Spiritual Education : १९ राज्यांतील १६० स्पर्धकांचा सहभाग; चिन्मय मिशनच्या राष्ट्रीय गीता पठण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकावली विजेतेपदे

Maharashtra Live news : माहुलीत शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध, मोजणीचे वाहन परतवून लावले

MPSC Paper Leak: पेपर फोडला तर १० वर्षे तुरुंगवास! १० कोटींचा दंड अन् मालमत्ताही जप्त होणार; सरकार आणणार कठोर कायदा

SCROLL FOR NEXT