मुंबई

तुर्भेत नऊ वर्षांच्या मुलीची हत्या लैंगिक अत्याचारानंतर गळा दाबून खून; ३० वर्षीय आरोपीला अटक

CD

तुर्भेत नऊ वर्षांच्या मुलीची हत्या
लैंगिक अत्याचारानंतर गळा दाबून खून; ३० वर्षीय आरोपीला अटक
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : तुर्भे परिसरातून बेपत्ता झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पावणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिराजवळील टेकडीवर मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ३० वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे.
मृत मुलगी शनिवारी (ता. १०) दुपारी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर तुर्भे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच, स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. या वेळी मुलीच्या परिचयातील आणि त्याच परिसरात राहणारा ३० वर्षीय व्यक्ती तिला खाऊ देऊन सोबत घेऊन जात असल्याचे फुटेजमध्ये दिसले. पुढील तपासात तो मुलीला रिक्षातून घेऊन गेल्याचेही समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
---
पावणे एमआयडीसीतील टेकडीवर आढळला मृतदेह
चौकशीदरम्यान आरोपीने मुलीला पावणे एमआयडीसी परिसरातील बावखळेश्वर मंदिराजवळील टेकडीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित परिसरात शोध घेतला असता, मुलीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT