मुंबई

नवी मुंबई विमानतळावर कार्गोची वेगवान झेप

CD

नवी मुंबई विमानतळावर कार्गोची वेगवान झेप
एका दिवसात आठ मालवाहू विमानांचे संचालन

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत ११ हजार ८५३ मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्यात आली. यातील ५४.६ टक्के मालाची वाहतूक आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. तसेच शुक्रवारी (ता. ९) एकाच दिवसात आठ मालवाहू विमानांचे यशस्वी संचालन करण्यात आले. या कामगिरीमुळे जागतिक मालवाहतूक क्षेत्रात नवी मुंबई विमानतळाचे महत्त्व वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विमानतळावरून जानेवारी ते सप्टेंबर २०२६ नऊ महिन्यांत सहा हजार ४७७ मेट्रिक टन आंतरराष्ट्रीय, तर पाच हजार ३७६ मेट्रिक टन देशांतर्गत मालवाहतूक झाली. यामध्ये पाच हजार २७४ मेट्रिक टन मालाची आयात, तर सहा हजार ५७९ मेट्रिक टन मालाची निर्यात करण्यात आली. ऑगस्टपासून मालवाहू विमानांच्या उड्डाणांमध्ये वाढ झाली असून, आतापर्यंत विमानतळावर २८५ एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्सची नोंद झाली आहे. त्यामुळे आयातदार, निर्यातदार आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांसाठी हे विमानतळ महत्त्वाचे केंद्र बनत आहे.
....
एका दिवसात आठ मालवाहू विमाने
कॅथे कार्गो, चॅलेंज एअर, कतार एअरवेज, एरोलॉजिक, एएफकॉम, एमएनजी एअरलाइन्स, एएसएल एअरलाइन्स आणि अटलास एअर या आठ कंपन्यांच्या मालवाहू विमानांचे शुक्रवारी (ता.९) यशस्वी संचालन करण्यात आले. या कामगिरीमुळे विमानतळावरील कार्गो टर्मिनलची क्षमता आणि मालवाहू विमानांसाठी उभारलेल्या पायाभूत सुविधांची कार्यक्षमता दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

Strait of Hormuz: मोठी दुर्घटना! 'होर्मुज'मध्ये अडीच हजार कंटेनर्स बुडाले; मालवाहू जहाज धडकलं, सप्लाय चेनवर होणार परिणाम...

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

Pune News : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT