मुंबई

तळोमध्ये महावितरणच्या भरारी पथकाची धडक कारवाई; बर्फ फॅक्टरीत तब्बल साडेसोळा लाखांची वीज चोरी उघड!

CD

तळोजामध्ये महावितरणच्या भरारी पथकाची धडक कारवाई
बर्फ फॅक्टरीत तब्बल साडेसोळा लाखांची वीजचोरी उघड!
पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : महावितरणच्या भरारी पथकाने तळोजा एमआयडीसी परिसरातील एका बर्फाच्या कारखान्यावर छापा टाकून वीजचोरीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. संबंधित कंपनीने तब्बल १६ लाख ५६ हजार ३२० रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी मालकाविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
तळोजा एमआयडीसीतील खेरणे येथील प्लॉट नंबर एम-२६ येथील मे.नासा इंडस्ट्रीज या बर्फाच्या कारखान्यात विनापरवाना व बेकायदेशीरपणे वीज वापर सुरू ठेवला होता. मागील जुलै महिन्यात महावितरणच्या भरारी पथकाने या कारखान्यावर छापा मारून येथील वीजचोरी उघडकीस आणली होती. या कंपनीने बाह्य स्रोत उपकरणाच्या सहाय्याने महावितरणचे वीज मीटर वारंवार बंद करून वीजचोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महावितरणने या कंपनीला वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्यास सांगितले होते, परंतु कंपनीकडून कोणतीही रक्कम भरणा करण्यात आली नाही. अखेर महावितरणने या कंपनीवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत कंपनी मालक जिथीन जोसेय कानाफ्पली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत शेतकरी आत्महत्यांचे सत्र; २५ दिवसांत १४ जणांनी संपवले जीवन, दुष्काळामुळे चिंता वाढली

आम्ही घाबरणार नाही, माघारही घेणार नाही! अभिजित दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन, नेमकं काय म्हणाले?

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

SCROLL FOR NEXT