मुंबई

पैशांचा पाऊस अन् आजार बरा करण्याचे आमीष

CD

पैशांचा पाऊस अन् आजार बरा करण्याचे आमिष
पनवेलच्या दाम्पत्याची साडेसात लाखांची फसवणूक
पनवेल, ता. २० (वार्ताहर) : पैशांचा पाऊस पाडण्यासह दम्याचा आजार बरा करण्याचे प्रलोभन दाखवून नाशिकच्या भोंदूबाबाने पनवेलच्या दाम्पत्याची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली. तक्रारदार महिलच्या डोळ्यांवर पट्टी बांधून गोदावरी नदीकिनारी पारदर्शक वस्त्र परिधान करण्यास भाग पाडून तिच्यावर अघोरी पूजा करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारीवरून गंगापूर पोलिस अरुण धोंडू पाटील नामक भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेत आहेत.
पनवेल येथील तक्रारदार महिला दम्याच्या आजाराने त्रस्त होती. २०२२ मध्ये तिच्या पतीला नाशिकच्या गंगापूर रोड येथील अरुण पाटील हा अघोरी पूजेने आजार बरे करीत असल्याची माहिती मिळाली. त्याची भेट घेतल्यावर कालभैरव पूजेने आजार बरा करण्यासह पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखविले. पूजेसाठी ५० हजार रुपये मागून त्यापैकी २५ हजार रुपये आगाऊ घेतले.
काही दिवसांनी दोन अनोळखी व्यक्ती पनवेलला आल्या. त्यांनी दाम्पत्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना नाशिकला नेले. तेथे महिलांनी महिलेला पांढरे पारदर्शक वस्त्र परिधान करण्यास दिले. पूजेनंतर डोळ्यावरील पट्टी काढताच भोंदूबाबा अघोरी पूजा करीत असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित २५ हजार रुपये घेतल्यानंतर भोंदूबाबाने कुठेही वाच्यता न करण्याची ताकीद देऊन दाम्पत्याला घरी सोडले.
---
आजार बळावल्याने दोन लाखांची मागणी
काही दिवसांनी महिलेची प्रकृती पुन्हा बिघडल्यानंतर त्यांनी भोंदूबाबाशी संपर्क साधला. त्याने पुढील पूजेसाठी दोन लाखांची मागणी केली. या वेळीही डोळ्यांवर पट्टी बांधून दाम्पत्याला गोदावरी किनारी नेण्यात आले. तेथे अघोरी पूजा करण्यात आली. दोन लाख रुपये घेऊन बोकडाचा बळी देणार असल्याचे सांगून त्यांना परत घरी पाठविले.
----
पाच लाख दिल्यावर फसवणुकीची जाणीव
भोंदूबाबावर विश्वास बसल्याने त्याने घरात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पाच लाख रुपये घेत विशेष पूजा करण्याचे प्रलोभन दाखवले; मात्र अनेक दिवस उलटून ना पैशांचा पाऊस पडला, ना आजार बरा झाला. भोंदूबाबाला विचारणा केली असता, तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने १९ ऑक्टोबरला गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Low Pressure Area : नैऋत्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार; पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा येलो अलर्ट

Supreme Court : २२ वर्षे खटला चालला, तरी आरोपी तुरुंगाबाहेर! सर्वोच्च न्यायालय हायकोर्टावर संतापले; आता थेट आत्मसमर्पणाचे आदेश!

Crime News: दांडिया उत्सवात जुन्या वादाचा भडका; चाकूहल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू, दोघे जखमी

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

Cheesy Popeye Poppers Recipe: बाहेरून कुरकुरीत, आतून चीजने भरलेले; पालक आणि काळ्या चण्यांपासून बनवा झटपट स्नॅक्स

SCROLL FOR NEXT