मुंबई

चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीवर जीवघेणा हल्ला

CD

चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीवर जीवघेणा हल्ला
हल्लेखोर प्रियकराला अटक
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने २१ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (ता. २०) सकाळी नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराबाहेर घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर वाशी येथील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पसार झालेल्या आरोपीला नेरूळ पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली.
सादिया जाहिर शेख (वय २१) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून, ती नवी मुंबई विमानतळावर नोकरीला आहे, तर दानिश मोहम्मद अन्सारी (२७) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. दोघेही वडाळा येथील ॲन्टाप हिल परिसरात राहतात. दानिश आणि सादियामध्ये चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सादियाचे अन्य तरुणाशी प्रेमसंंबंध असल्याच्या संशयातून दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होता. त्यातूनच सादियाला मारहाण केली होती. याप्रकरणी नवी मुंबई विमानतळ तसेच ॲन्टॉप हिल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. सततच्या त्रासामुळे सादियाने त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. सादिया नेहमीप्रमाणे सोमवारी कामावर जाण्यासाठी जीटीबीनगरवरून लोकलने नेरूळ येथे आली. दानिशही पाठलाग करीत नेरूळपर्यंत पोहोचला. सकाळी ६.४५ वाजता नेरूळ स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील बस थांब्याजवळ दानिशने सादियावर अचानक चाकूने हल्ला केला. पाठ, पोट, मान आणि छातीवर पाच ते सहा वार केले.
हल्ल्याची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणीला उपचारासाठी वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल केले. तिच्या तक्रारीवरून दानिशविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कांबळे यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बिपीन तुतुस्वाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT